आठवडी बाजार

आठवडी बाजार

आज आठवडी बाजार … तसा वर्ष भरात प्रत्येक आठवड्यातून एक दिवस आठवडी बाजार भरतो . आजूबाजूला असलेल्या गावातले सर्व लोक या बाजारात सामान खरेदी करण्यासाठी येत असतात . पण आता दिवाळी पाच दिवसावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या बाजारात लोकांची गर्दी, वाहनांची गर्दी , शाळेतील मुले घरी जाण्याची लगबग दिसते . आता पावसाचा बेभरोसा असल्यामुळे भात या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. दिवाळी सुरु होण्याच्या आधी काही वर्षा पूर्वी शेतकऱ्यांचे भात शेती कापून झालेली असे . भात काढल्यानंतर जी पाओली (भात काढल्यानंतर जो भाग गवतासारखा शिल्लक राहतो )उरते . त्यापासून जी पावोली विकली जाते त्यातून पैसा येतो. तो पैसा वापरून खरेदी केली जात असे . आठवडी बाजाराचे वैशिष्ट्ये म्हणजे या बाजारामध्ये खिशाला परवडेल या दरात वस्तूची विक्री केली जाते . जी सर्व सामान्यांना परवडण्याजोगी असते .

या बाजारात मोठ्या प्रमाणावर सुका (मावरा )मासळीची तसेच ताजी मासळीची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. गावकरी तसेच पाड्यावरची लोक या सुक्या मावरा मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवतात .

बाजारात कपडे विक्रीस असतात. कपडे हे लहान मुलांन पासून ते जी सध्या शहरामध्ये नव नवीन फॅशन बघायला मिळते ते सर्व कपडे उपलब्ध असतात. जे मोठ्या दुकानापेक्षा कमी भावात मिळतात . मुलांसाठी दप्तरे , भांडी , तसेच अनेक खाद्य प्रकार मिळतात. डाळी , गोडेतेल , कांदे , बटाटे , कडधान्य , साबण , झाडू , खराटे मिळतात . शहरात ज्या प्रकारे सुपर मार्केट , बिग बाजार मध्ये ज्या प्रकारे सर्व वस्तू उपलब्ध असतात . त्याच प्रकारे आठवडी बाजार सर्व वस्तू योग्य दरात मिळतात.
सर्व प्रकारचे फळे , जसे केळे, सफरचंद , खजूर ,अननस , ऊस , डाळिंब ,पेरू , चिकू ,आंबे ( सीजन नुसार )मिळतात . बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्या , गृह उपयोगी वस्तू मिळतात . सध्या बाजारात दिवाळी जवळ आल्यामुळे फटाक्यांचे दुकान दिसू लागलेत , फटाके घेण्यासाठी लहान मुलांचे रेल चेल दिसते . सर्वत्र रंगबेरंगी आकाश कंदील , लाइटिंग ची गर्दी दिसते . प्लॅस्टिकच्या पिशव्याची बंदी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापडी पिशव्याची विक्री होताना दिसते . गावाकडे आठवडी बाजाराचे विशेष महत्व आहे 

“>Online Shopping “>Here

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »