आरोग्य धन संपदा

आरोग्य धन संपदा

आरोग्य

(If you Listening Podcast Click Here)

 आरोग्य हि  संपत्ती आहे.  चांगले आरोग्य हे आपल्या आयुष्यातील महत्वाचे घटक आहे, पण वास्तविक पाहता संपत्ती म्हणजे पैसा असे सर्वसामान्यपणे मान्य केले जाते, पैसा जो नेहमी आपल्याला मदत करण्यास सक्षम असतो. परंतु आरोग्य हि आपल्या आयुष्यातील अशी संपत्ती आहे,ज्याच्याशिवाय  आपले आयुष्य अपूर्ण आहे.

आणि म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. काही चांगल्या सवयी आपण लावून घेणे फार महत्वाचे आहे.

सध्या आपली जीवन शैली फारच बदलेली आहे. यांत्रिकी कामामुळे शारीरिक कष्ट कमी झाले आहे.त्यामुळे लट्ठ पणाच्या समस्या उद्भवत आहेत. यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे.व्यायाम आणि आहार यामध्ये हि बदलत्या जीवन शैलीचा  प्रभाव दिसतो  आहे , आपण अयोग्य आहार,  अ-पौष्टिक खाद्यपदार्थ चवीने खातो . आणि वेळेची बचत करण्यासाठी रस्त्यावरचे Fast Food  चवीने स्वीकारले जात आहेत. आणी  म्हणूनच याचा दुष्परिणाम म्हणजे वाढते भयंकर असे आजार, आरोग्याचा विविध समस्या उद्भवत आहेत , मृत्युदराचे वाढते प्रमाण  मग ह्या  सगळ्यावर काय पर्याय असू  शकतो ?

तर ह्या सर्वावर पर्यायी म्हणजे म्हणजे सकस आहार  ज्या मध्ये शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे (Vitamin,

Minerals, Proteins, Nutrition  ) मिळालीच पाहिजेत.

योग्य डायट चा उपयोग प्रत्येक दिवशी केला पाहिजे. त्याचबरोबर व्यायाम केला पाहिजे .

यामध्ये आपण योगासन , प्राणायाम , चालणे – धावणे मोकळ्या हवेत फेरफटका मारणे अश्या गोष्टी करू शकतो.

सकाळी फेरफटका मारल्याने शरीराला उर्जा प्राप्त होते. यामुळे संपूर्ण  दिवस आपला आनंदात जातो .

दिवसभर फ्रेश वाटत.प्रत्येक दिवशी साधारणत 30 ते 45 मिनिटे व्यायाम केला पाहिजे .

तर शेवटी एवढच कि ‘आरोग्यम् धनसंपदा’  कामे करा , मेहनत करा पण त्या बरोबरच स्वतः ला जपा आरोग्याची काळजी घ्या !

लेखन – निलम निकाळजे

Health