साडी व्यवसाय

साडी व्यवसाय

आज मार्केट मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने बघायला मिळतात कपडे,ड्रेस मटेरीयल, नव नवीन फॅशन चे कपडे दिसून येतात , वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघावयास मिळतात.

आज आपण साडी या  व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत . भारतातील मोठ्या प्रमाणात महिला साडी परिधान करतात . साडी मध्ये देखील बऱ्याच प्रकारची नव नवीन फॅशन बघण्यास मिळते.

तरुण सुशिक्षित बेरोजगार मुला-मुलींसाठी हा एक चांगला व्यवसाय बनू शकतो. जर तुम्ही साडी विक्री चा व्यवसाय सुरु केलात, तर या मध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवू शकता .

साडी मध्ये प्रिंटेड साडी, अम्ब्रोडरी कोडींग वर्क , अम्ब्रोडरी साडी, बोर्डर वर्क साडी, हाल्फ-हाल्फ साडी,  डिसाईनर प्रिंट,सिल्क कपडा वाली साडी. हॅड वर्क साडी,कसाब-जेरी साडी, चेक्स पॅनल साडी,रंगोली पॅटर्न, पार्टी वेअर साडी,नेट साडी, आर्ट सिल्क विथ रिच पल्लू , सिल्क कॉटन बॉक्स स्कीवन साडी ,गोरोद साडी, टोसोर सिल्क साडी, डिजिटल प्रिंट लिनेन साडी,चेक सिल्क कॉटन साडी, विचित्रा सिल्क साडी, जरी पल्लू साडी , जमदानी साडी ,मध्यामोनी साडी ,कांजीवरम सिल्क साडी  अशा प्रकारे अनेक प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत.

तुम्हाला सर्व प्रकारच्या रंगात साडी उपलब्ध होतात.

ह्या साड्या तुम्ही मोठ्या सुरत सारख्या तसेच इतर मार्केट मधून घेऊण विक्री करू शकता . सुरत हे मोठे साडी मार्केट आहे.जेथून तुम्ही साड्यांची खरेदी करून तुम्ही तुमच्या दुकानामध्ये विक्री करू शकता .

साड्यांची विक्री करताना

तुमचा शॉप चांगल्या ठिकाणी म्हणजेच मार्केट मध्ये असणे गरजेचे आहे .

त्याचप्रमाणे दुकानामध्ये सजावट थोड्या फार प्रमाणात करणे गरजेचे आहे.

चांगल्या क्वालिटीच्या साड्या विक्रीसाठी ठेवणे गरजेचे आहेत. तुम्ही कमी किमंती पासून जास्त किमंती पर्यंत साड्या विक्री साठी ठेवू शकता. म्हणजे एकदा ग्राहक तुमच्या दुकानात खरेदीसाठी आला कि त्याला हवी असलेले व्हरायटी उपलब्ध झाली पाहिजे .

साड्यांचे अनेक प्रकारचे कलेक्शन असावे.

सुरुवातीला किमंती ह्या कमी ठेवल्यामुळे ग्राहकांना तुम्ही चांगल्या प्रकारे आकर्षित करू शकता.

ग्राहकांशी तुम्ही कशा प्रकारे सवांद साधता त्यावर देखील तुमचा व्यवसाय निर्भर असतो .

ग्राहकांकडून तुम्हाला एकदा योग्य प्रकारे प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली कि तुमच्या व्यवसायाची उंची वाढण्यास वेळ लागणार नाही.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

Ekunaddiwas.com

Business Idea