Apana Time

Apana Time

प्रयत्न करा ! एक दिवस आपलाच आहे.

(Click Here To Listening Audio Podcast Apana Time)

वेळ प्रत्येकाची येते आणि आपण आपल्या वेळेची वाट बघत असतो.परंतु ह्या वेळेची वाट कधीपर्यंत बघत बसणार आहात ?

वेळ अनमोल आहे.

    कधी तरी, कुठे तरी सुरवात झाली पाहिजे .काम करण्याची जिद्द मनात ठसली पाहिजे . मेहनत प्रत्येक जन करतो परंतु सर्वांनाच यश पाहिजे तेवढे मिळतेच असे नाही.

सकाळी उठल्यापासून रात्री घरी येईपर्यंत सर्व जन वेगवेगळ्या स्तरावर काम करतात  . काम हे शिक्षणावर ,अनुभवावर ,कामाच्या पद्धतीवर अवलंबून असते. कामाचे देखील अनेक प्रकार येतात.प्रत्येक स्तरावर वेतन,मजुरी,मानधन हे  वेगवेगळी असते.

 उदा.दोन व्यक्ती  वेगवेगळ्या स्तरावर काम करतात.त्याच्या वेतनामध्ये देखील भिन्नता आढळून येते.दोघांची  राहणीमान मध्ये देखील भिन्नता आढळून येते.

Work Hard

 प्रत्येक जन आपले स्वप्न बाळगून काम करत असतो . काहीतरी करण्याची जिद्द त्याला ते काम करण्याची उर्जा देत असते . क्षेत्र कोणतेही असो प्रयत्न हा करावाच लागतो.

अजून वेळ आहे ,अजून वेळ आहे असे म्हणताना वेळ कधी निघून जाईल ते समजणार नाही परंतु वेळ निघून गेली म्हणून  पश्चाताप करण्यापेक्षा जो वेळ उरलेला आहे त्या वेळेत सगळी जिद्द एकटवा,सगळी उर्जा एकत्रित करून तुमची ओळख निर्माण करा.

Goal setting

आपण आपला गोल ठरवला पाहिजे . त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास स्वताहून निर्माण करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल  करत मार्गक्रम करत चालत राहिले पाहिजे,

परंतु असे प्रत्येकाचे होताना दिसत नाही.

 प्रत्येक जन  प्रयत्न करण्यास सुरुवात करतात आपले ध्येय गाठण्यासाठी, परंतु काही जन त्या विशिष्ट ध्येयासाठी लागणाऱ्या तयारीची सुरुवात मात्र मनातच ठेवतात, ते कृती करत नाहीत, त्या मार्गावर चालत नाहीत. काहीजण  सुरुवात करतात परंतु पुढे येणारे अडथळे , मानसिकता , पैशाचा चणचण ,परिवार या मुळे ठरवेलेले ध्येय अर्ध्यावरच सोडून देतात.व दैनंदिन जीवन कसे सुरुळीत चालले याच्या मागे लागतात.

    खूप कमी जन आपले ध्येय अनंत अडचणीवर मात करत गाठतात व यशस्वी होतात. परंतु या यशापर्यंत पोहचण्याचा मार्ग हा सोपा नसतो.

Keep Trying

प्रयत्न केलेले कधीही वाया जात नाही, त्याचा  एक न एक दिवस मोबदला आपल्याला जरूर भेटतो.  

क्षेत्र कोणतेही असो, त्या क्षेत्रावर, आपल्या कामावर असलेला प्रचंड आत्मविश्वास, आपली काम करण्याची शक्ती आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करते. व आपण एक दिवस नक्की यशस्वी होतो.

    कोणत्याही चांगल्या  कामाची सुरुवात हि उद्या,परवा पासून तसेच  भविष्यात न  करता ती आज या क्षणा पासून करा . अंगी ते स्वप्न बाळगा तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही.

कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वय-वेळ ठरत नाही, तुमची सुरुवात महत्वाची असते . तुम्ही केलेली नवीन  सुरुवात तुम्हाला यश देईलच असे नाही ,परंतु पर्यंत करायचे सोडून देऊ नका .

अनेक व्यक्ती  हे त्यांच्या कर्तुत्वाने लहान वयातच यशस्वी झाले तर  अनेक व्यक्ती  हे त्यांच्या कर्तुत्वाने वयाच्या ६० वर्षानंतर  यशस्वी झाले. यश मिळ्ण्यासाठी वय कारणीभूत नसते.     

एक,दोन तसेच अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले म्हणून खचून जाऊ नका .

नवीन सुरुवात करा, प्रवास खडतर असेल परंतु येणारे दिवस हे सुखाचे ठरतील . हे विसरू नका.

सकाळ आता झाली, संध्याकाळची फिकीर नसावी, अजून दुपार बाकी आहे !!

Success is no accident. It is hard work, perseverance, learning, studying, sacrifice and most of all, love of what you are doing or learning to do.

Pele

Ekउनाड दिवस