गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

Athvanitli Goshti

(If you Listening Audio Podcast Please Click Here)

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी . आज ही  आपण काहीतरी काम करत असतांना अचानक आपल्या चेहऱ्यावर हसू येते बालपणीचा एखादा किस्सा  आठवतो .

मन प्रसन्न होते .खरच खूप सुंदर होते ते दिवस,बालपणीचे मित्र,न कसल्या कामाची चिंता, होती ती बस मौज मजा !

पिकलेली बोर,चिंच खाण्याची मज्जा बालपणी काही औरच होती. साबणाचे फुगे उडवणे , पतंग उडवणे ,भोवरा खेळणे, फुलपाखराच्या मागे धावणे. असे कितीतरी गोष्टी आपण करत असत .

आजही  चिंच,बोर,आंबे,काजू  झाडावर पिकलेली दिसतात परंतु आपण थांबून ते पाडण्याच्या ,तसेच खाण्याच्या भानगडीत पडत नाही ज्या प्रमाणे बालपणी आपण या सर्व गोष्टी आवडीने खात असत कदाचित ती आवड आता आपल्यात राहिलेली नाही.

शाळेत असताना वनभोजनाला जाने , चार चार जणांचे ग्रुप करून झाडाच्या पाठीमागे डबा खाणे एकमेकांच्या हाताला हात धरून घरी येणे अशा कितीतरी गोष्टी आज आठवणीत जमा झाल्या आहेत.

Rahilya Fakt Athavani

     लहानपणी जत्रेत,यात्रा इतर ठिकाणी  जाण्याची खूप इच्छा  असायची जत्रेत गेल्यावर पाळण्यात बसने ,सर्कस बघणे त्याचप्रमाणे खेळणी घेणे, पिपाणी ,शिट्टी वाजवत गावभर फिरत असत. पैसे नसल्यामुळे काही गोष्टी घेता येत नसत रडत रडत आई बाबांच्या मागे एखाद खेळण घेण्यासाठी साठी सतत तगादा लावत असत .

परंतु आज आपणाकडे पैसा असूनही त्या वेळेस राहिलेल्या गोष्टी घेवून त्याचा आनंद घेवू शकत नाही. किंवा आपण आता यात्रा, जत्रा इतर गर्दीचे ठिकाणी जाण्यास नापसंती दर्शवतो.     

लहानपणी सुट्टीच्या दिवसात  मामाच्या गावाला  जाऊन आवडीने  मौज मजा करीत असत. नदीवर पोहायला जात,डोंगरावर भटकत. एखादी नवीन गोष्ट बघण्याची उत्सुकता मनात असे.

शाळेत मित्रांच्या खांद्यावर हात टाकून फिरत असत. कापसाची म्हातारी पकडण्यासाठी कितीतरी लांब जात असत . वर्ग चालू असताना चटक्याच्या बिया घासून गपचूप बाजूच्या मित्राच्या चटका देत ती सर्व मजा वाढत्या वयानुसार आठवणीत जमा झाली.

गेले ते दिन गेले

एखाद्या झाडाच्या खाली कितीतरी वेळ बसून गप्पा गोष्टी करण्यात किती वेळ निघून जात असे ते समजत नसे . वरिष्ठ व्यक्तींकडे एखादी जुनी  गोष्ट सांगण्याचा तगादा लावत असत. भुताच्या गोष्टी, चमत्काराच्या गोष्टी ,पौराणिक गोष्टी विशेष प्रसिद्ध होत्या .

     आपल्या बालपणी दूरदर्शन बघायची मजाच काही और असे सिग्नल अनेक वेळा जायचे, त्यावेळेस एक जनाला छतावर  चढवून एन्टिना फिरवायला लागे व खाली असलेला पोराला सिग्नल आले का नाही ते बघायला लागे.

शनिवार रविवार चे कार्यक्रम सर्व जन एकत्र येऊन बघत असत.

लहानपणी सायकल घेवून भटकणे,गोट्या खेळणे, विटीदांडू खेळणे,लपंडाव खेळणे,वड पारंबी , मोठ्या झाडावर पकडा पकडी खेळणे , क्रिकेट,लंगडी खेळणे,नदीवर पोहायला जाने, काजू ,आंबे आणायला जाने असे अनेक उद्योग आपण आपल्या बालपणी करत असत.

गुरांना शेतात चाराण्यासाठी  नेणे,त्याच प्रमाणे पक्षांचे पिस गोळा करण्याचा छद असायचा . वेगवेगळ्या झाडांची पाने पुस्तकात ठेवण्यासाठी धडपड असायची

आज आपल्या वाढत्या वयामुळे त्याच प्रमाणे बदलत्या काळानुसार  या सर्व गोष्टींचा विसर पडला आहे. आपल्या बालपणी आपण अनेक खेळ खेळत असत . सर्व मुल  एकत्र येवून मौज मस्ती करत . एका जागी बसून गप्पागोष्टी करत .

आज एक गोष्ट प्रखरतेने जाणवते कि आपण लहान असताना आपण मोठे कधी होणार बाबा सारखे कामावर तसेच मोठ्या भाऊ, बहिणी सारखे कॉलेज ला कधी जाणार असे वाटत असे , आणि आज आपण मोठे झालो आहोत. काम करत असताना आज आपणास बालपणीच्या आठवणी येतात व आज आपले मन आपण लहान झालो असतो तर किती बर झाल असत असे सांगण्यास भाग पाडत आहे.

बालपणीच्या त्या सुंदर सोनेरी गोष्टी आठवून नकळत डोळ्यात पाणी येते.

आज मुलांना मैदानी खेळाचा विसर पडत चाललाय . मोबाईल त्यांना जास्त जवळचा वाटू लागला आहे.

कधीतरी अचानक जुन्या आठवणी जाग्या होतात अलगद आपल्याला त्या सोनेरी दुनियेत घेवून जातात. गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी !

Ekउनाड दिवस