maza avadta chand Marathi

maza avadta chand Marathi

माझा आवडता छंंद मराठी माहिती

(If you listening Audio Please Click Here)

प्रत्येक मनुष्याचा कोणता तरी आवडता विषय असतो जो जोपासल्यामुळे त्यामधून आनंद तसेच समाधान मिळते. ज्याची त्याला सवय होते त्यालाच आपण छंद म्हणू शकतो. छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड.

रिकाम्या वेळेत काहीतरी करमणूकेचे साधन म्हणजे छंंद होय.

छंद हा आवड म्हणून जोपासला जातो.

खूप जणांना पोस्टाची तिकीटे(स्टँप)  गोळा करण्याची विशेष आवड असते, त्याचप्रमाणे आपल्या देशातील नोटा तसेच वेगवेगळ्या देशातील नोटांचा संग्रह करण्याची विशेष आवड दिसते. जुने नाणे गोळा करणे व त्याचे जतन करून ठेवतात.

   अनेकांना लहानपणी वेगवेगळ्या पक्षांचे रंगबिरंगी  पिसे गोळा करण्याची   विशेष आवड दिसून येते  .

शाळेत असताना विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळ्या झाडांची पाने, फुले पुस्तकात वहीत ठेवण्याची आवड असे.

त्याचप्रमाणे चॉकलेट,कॅडबरी यांचे कागद वही पुस्तकात जतन करून ठेवत असत.

My Hobbies

अनेकांना लहान पनापासून वाचनाची आवड असते जसे की अभ्यासाची,लेखकांची पुस्तके, गोष्टीचे पुस्तके,कविता ,पेपर ,कांंदबरी , लेख, मॅगझीन , तसेच ऑनलाइन आर्टिकल्स ,ब्लॉग वाचण्याची आवड दिसून येते.

त्याचप्रमाणे चित्र काढण्याची आवड  दिसून येते. तसेच फोटोग्राफी करणे पशु, पक्षी ,फुले ,डोंगर ,समुद्र किनाऱ्यावर जाऊन फोटो काढणे.

अनेकांना लिखाणाची आवड असते, कविता करण्याची आवड, गाणी गुंणगुणने, तसेच बडबड करण्याची देखील सवय असते.

नवीन तसेच जुन्या-पुराण्या वस्तू गोळा करण्याची आवड असते तर काही इलेक्ट्रिक वस्तू खोलून पुन्हा जोडण्याची आवड असते.

पावसाळ्यात झाडावरील चमकणारे काजवे बघत बसने त्याचप्रमाणे ते काजवे पकडून काचेच्या बाटलीत भरण्याची विशेष आवड असे.

   लहानपनी गोट्या खेळणे व जमा करणे तसेच सुट्टीच्या दिवसात काजूच्या तसेच इतर झाडांच्या बिया जमा करून बाजारात विकणे असे अनेक उद्योग चालत असत. पोहायला जाने ,नदीतील गोल, पांढऱ्या तसेच रंगीत दगडा गोळा करणे असा आवडता छंंद असे.

mazi avad

   एक विशेष छंद लागतो तो म्हणजे रात्री मोकळ्या जागेवर तसेच अंगणात बसून एकटक आकाशात बघून चमकणारे तारे मोजण्याचा प्रयत्न करणे तसेच त्यांची बदलती दिशा बघणे ,चंद्राचे होणारा लहान मोठा आकार  व चंद्रावर कडे एकटक बघून निरीक्षण करणे,  तारा कधी तुटतो त्याची वाट बघत बसने.

काहीजन  तासन तास टीव्ही समोर बसलेले असतात तर काही मोबाईल वर व्हिडीओ तसेच गाणे ऐकत बसतात.  

सुट्टीच्या दिवशी चित्रपट गृहात जावून चित्रपट बघणे,नाटक बघणे, अनेक समारंभात उपस्थित राहणे. असे छंंद असतात.

   संगणकावर तसेच स्मार्ट फोन वर नवीन नवीन माहिती शोधण्यात अनेकांना कुतूहल असते ,नवीन माहिती मिळविण्याची अनेक जन प्रयत्न करीत असतात, जगाच्या कानाकोपऱ्यात काय चालले  आहे याचे अनेकांना कुतूहल असते.

स्त्रियामध्ये  विशेष करून तोरण बनविणे, कपडे शिवणे,नव नवीन पदार्थ तयार करून बघणे, पाककला शिकणे  ई.गोष्टी बनविण्यात त्याची विशेष आवड असते.

   तरुण मंडळींना गड किल्ले फिरणे, नवीन पर्यटन तसेच ऐतिहासिक ठिकाणी भेटी देणे, तेथील इतिहास जाणून घेणे याची विशेष आवड असते . प्रवास करणे नवीन स्थळी भेटी देणे,देवस्थानी जाने , परिवारासोबत फिरायला जाने असे अनेक छंद दिसून येतात. लहान तसेच मोठ्या मध्ये नकाशाचे निरीक्षण करणे.

क्रिकेट,कब्बडी,खो-खो,फुटबॉल इतर मैदानी खेळ खेळणे तसेच खेळ मैदानात बघायला जाने विशेष आवडते . व्यायाम शाळेत जाणे, कसरत करणे, सायकल चालवणे,मोटार सायकल घेवून लांब फिरायला जाने आवडते.

छंद ला मर्यादा नाहीत ते प्रत्येकाच्या आवड निवडीवर ठरलेले असतात. प्रत्येकाला वेगवेगळा छंद असतो. छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड.

Ekउनाड दिवस