Bad Breath

Bad Breath

आपल्या व्यक्तिमत्व खुलवायला अनेक गोष्टी कारणीभूत  असतात.

कपड्यांचा पेहराव ,केसाची रचना,हातातील घड्याळ, पायातील बुट ,चप्पल, शरीराची ठेवण त्याचप्रमाणे बसण्याची शैली , संभाषण शैली या अशा अनेक नाना पद्धतीने आपले व्यक्तिमत्व खुलते.

तोंडाचा वासामुळे आपले इंप्रेशन कमी होते .सार्वजनिक ठिकाणी ते लज्जास्पद वाटते.

आपण रोज सकाळी उठल्यावर ब्रश करतो , तरी देखील काही वेळाने तोंडाचा वास (Bad Breath) येतो .

वेगेवेगळ्या महागड्या टूथपेस्ट वापरतो,त्याचप्रमाणे माऊथ फ्रेशनर चा वापर करतो.

आपली चीभ देखील सकाळी उठल्यावर साफ केली पाहिजे कारण ,ब्रश करून दात स्वच्छ होतात, परंतु चीभ स्वच्छ होत नाही .

तोंडाची दुर्गंधी येऊ नये  (Bad breath Causes) म्हणून खालील पैकी उपाययोजना करता येतात.

ब्रश करणे

सकाळी उठल्यावर तसेच रात्री झोपण्याच्या आधी ब्रश करायला हवाय . म्हणजेच दिवसातून दोनदा ब्रश करावा.त्याच प्रमाणे चीभ स्वच्छ करावी .

खालेले अन्नाची लेयर आपल्या चीभेवर साचलेली असते यामुळे देखील दुर्गंधी येते . यामुळे सकाळी चीभ स्वच्छ करावी.

पाणी पिणे

शरीरातील पाण्याची पातळी देखील योग्य राखली पाहिजे . पाण्याची पातळी  कमी होवून देवू नका. पाण्याची पातळी  कमी झाल्यामुळे तोंड कोरडे पडते तसेच लाळेचे प्रमाणही कमी होते व तोंडाचा वास येतो.

दिवसभर भरपूर पाणी पिल्ले पाहिजे .या मुळे  तोंडाचा घाणेरडा वास देखील कमी होईल.  पाण्याच्या गुळण्या करणे योग्य ठरते.

ग्रीन – टी 

ग्रीन टी पिल्यामुळे तोंडातून येणाऱ्या वासाचे प्रमाण कमी होते, ग्रीन – टी मध्ये Anti Bacteria चे अनेक गुण आहेत.

ज्याचा तोंडातून येणाऱ्या दुर्गांधीसाठी फायदा होतो.

Vitamin C

संत्री ,लिंबू,द्राक्ष ,टोमॅटो  किंवा आंबट असणाऱ्या फळामध्ये Vitamin C  चे प्रमाण अधिक असते .

हे पदार्थ तोंडातील दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात.

बडी शोप जेवण झाल्यावर खाल्याने जेवणाची पचन होते .तसेच तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी मदत होते.नियमित बडी शोप खाल्याने  दुर्गंधी नष्ट होते.

तुळशीची पाने चावल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते.

वेलची तोंडात चघळत रहावे जेणे करून तोंडाची  दुर्गंधी कमी होते,

लवंगाच्या , दालचिनी आपल्या जेवणातील भाज्या चविष्ट करतातच त्याचप्रमाणे त्या तोंडात ठेवल्याने दुर्गंधी नष्ट होते.

बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत परंतु आपण घरगुती उपाय करून तोंडाची दुर्गंधी घालवू शकतो.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »