जातपडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र

जातपडताळणीसाठी आवश्यक कागदपत्र

Caste Validity Document Details

आपण येथे जातपडताळणी साठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची माहिती घेवूया

जातपडताळणी ही नोकरीसाठी,शिक्षणासाठी , निवडणूकीसाठी आवश्यक असते .

तर बघूया थोडक्यात किती आवश्यक कागदपत्र लागतात .

शिफारस पत्र  

1) for Education (कॉलेज, महाविद्यालय  यांचे शिफारस पत्र )

2) For Election ( जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे शिफारस पत्र

३) For Government Job (नेमणूक अधिकारी यांचे शिफारस पत्र )

4) जमीन खरेदी विक्री अथवा इतर कामाकरिता असल्यास संबंधीत  आस्थापणा प्रमुखाचे शिफारस पत्र

अर्जदाराचे स्वता: चे  खालील प्रमाणे कागदपत्र

 जातीचा दाखला *

 जन्म प्रमाणपत्र

 शाळा सोडल्याचा दाखला (प्राथ, माध्यमिक)

 शाळा प्रवेश उतारा / नमुना १ चा उतारा

नमुना ‘फ’मधील रु १०० चा प्रतिज्ञापत्र त्यात अर्जदाराचे जातीचा दाखल्याचा अनुक्रमांक , जातीचा दाखला कोणी निर्गमित केला त्याचा पूर्ण उल्लेख असावा .अर्जदाराचे जातीचा उल्लेख तसेच वंशावळ असणे आवश्यक आहे .

सेवेत असल्यास सेवा पुस्तकाचा पहिल्या पानाचा उतारा

ग्रामपंचायत रहिवासी दाखला

जमीन असल्यास ७/१२ उतारा

अर्जदार फोटो/ सही/ वडिलांची सही  *

अर्जदाराचा आधारकार्ड

कुटुंबातील जातपडताळणी

नातेवाईक कागदपत्रे

अर्जदाराच्या  कुटुंबातील सखे ( भाऊ , बहिण /वडील /काका, आजोबा  )*  यांचे

 – जातीचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला , जन्म प्रमाणपत्र  तसेच इतर कागदपत्रे

अर्जदार फाइल जमा करते वेळेस आय डी ,पासवर्ड असणे आवश्यक  असते

अनुसूचित जमाती (ST) https://etribevalidity.mahaonline.gov.in/

 व इतर सर्व  https://barti.maharashtra.gov.in/ECasteValidation/CCVIS/Index.html

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »