chakrivadal in marathi

चक्रीवादळ हे खूप विध्वंसक असते या पासून खूप  नुकसान होते . भारतामध्ये हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या वादळाचा तडाखा किनारपट्टीला बसतो. यामुळे आर्थिक , तसेच जीवितहानी मोठ्या प्रमाणात होते . हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश मध्ये ‘सायक्लोन’ असे म्हणतात.अटलांटिक मध्ये होणाऱ्या वादळाला ‘हरिकेन’ तसेच पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला ‘टायफून’ ह्या नावाने ओळखले जाते.

वादळ जेव्हा जमिनीवर तयार होते त्याला ‘टोरनॅडो’ असे म्हणतात.

चक्रीवादळाची निर्मिती

समुद्रात कमी दाबाच्या प्रदेशाभोवती येणाऱ्या वाऱ्यामुळे वादळ तयार होते.समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाचा निर्मितीचा मोठा घटक आहे. उष्ण व आद्र हवा यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्यास मदत होते.

चक्रीवादळाच्या वाऱ्याच्या वेगावरून त्याच्या विध्वंसक शक्तीचा अंदाज येतो.

चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते . घरांचे नुकसान होते ,छपरे उडतात ,पिकांचे नुकसान होते, झाडे पडतात,वीज पुरवठ्यास धोका निर्माण होतो.इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

चक्रीवादळामध्ये वाऱ्याचा वेग वाढतो , चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळदार पाऊस पडतो व पूर सदृश परिस्थिती निर्माण होते. चक्रीवादळामुळे समुद्र खवळतो व उंच लाटा किनारपट्टीला धडकतात.

आजपर्यंत बंगालच्या उपसागरात अनेक प्रकारची चक्रीवादळ आले.

चक्रीवादळ चा वेग हा ताशी ९० ते ताशी २८० किमी पेक्षा जास्त असू शकतो.  

चक्रीवादळ ला विशीष्ट नावे दिले जातात.  

phailin

hudbhud

Titli

Ockhi

Bulbul

Gaja

Fani

Amphan

चक्रीवादळाची मापन करण्याची पद्धती  

वातावरणशास्त्र

सरसरी अवलोकन

उपग्रहाची मदत घेवून

रडार वापरून

वादळाचे इतर प्रकार

धुळीचे किंवा रेतीचे वादळ

पावसाचे वादळ

बर्फाचे वादळ

मेघगर्जनेचे वादळ

Written By

EkUnadDiwas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »