DO WORK

DO WORK

काम करा.

कामे (works) हि अनेक प्रकारची असू शकतात . सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काम असतेच परंतु काम करणे तितकेच महत्वाचे आहे ,

(Click Here To listening Podcast Do-Work)

उगाच कट्यावर बसून गोष्टी करण्यात काही अर्थ नव्हे , परंतु कट्यावर तर बसलेच पाहिजे जेणेकरून जेव्हा आपल्याला निवांत वेळ मिळतो,

तेव्हा एकमेकांना जाणून घेण्याचे तसेच गप्पा गोष्टी करण्याची तीच योग्य वेळ असते ,

कामाचे अनेक प्रकार पडतात . शेतीची कामे , शिक्षण घेतल्या नंतर उपलब्ध होत असणाऱ्या सरकारी ,खाजगी नोकरी, त्याच प्रमाणे सेवा प्रकार ,

कामाचे अनेक प्रकार वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असतात,

 कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. दोनवेळेचे अन्न मिळण्यासाठी काम हे करावेच लागते . काम केले नाही तर कोणीही आपल्याला  खायला देणार नाही.

आपण सक्षम असताना उगाच भटकत बसण्यापेक्षा काहीही छोटे मोठे काम करणे नेहमीच उत्तम.

(Works) काम हे कोणतेही असो काम करण्याचा आनंद तसेच समाजामध्ये असणारी आपली प्रतिमा ही आपण करत असणाऱ्या कामामुळे नेहमी उठून दिसते .

कामामुळे आपणास मान-सन्मान मिळतो. कामाची व्याप्ती हि कामावर निर्भर करत असते. (Work) काम करून जो मोबदला आपणास मिळतो त्यामधून आपणाला आपल्या गरजेच्या वस्तू बाजारातून आणता येतात.

रस्त्याने समोरून जाणाऱ्या गाडीकडे बघून ती गाडी घेण्याची इच्छाशक्ती आपणाला होते,

परंतु ती गाडी घेण्यासाठी लागणारी मेहनत आपणाला हि करावी लागते.

एखादा श्रीमंत व्यक्ती बघून आपणाला देखील त्या सारख राहणीमान ,घर,कपडे, गाडी फिरवावी वाटते,परंतु ती व्यक्ती त्या स्थानापर्यंत पोहचण्यासाठी त्याने त्याच किती आयुष्य खर्ची घातलं त्याने किती मेहनत घेतली याचा देखील अभ्यास आपणाला करायला हवा.

आपण जे (Works) काम करणारा आहोत त्या कामावर प्रेम करा , जर काम करताना तुम्हाला त्या कामामध्ये समाधान वाटत नसेल तर समजा कि तुम्ही त्या कामामध्ये आनंदी नाहीत तुम्हाला जे आवडेल त्या कामाकडे तुम्ही वळा .

(Works) काम करताना आपणाला त्या कामामध्ये समाधान मिळायला हवे.

कामात मिळणारे समाधान कामातील स्वारस्य , कामातील निपुणता आणि  एकाग्रता यावर अवलंबून असते.

कामाच्या ठिकाणचे सकारात्मक ,नकारात्मक वातावरण बघा.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपण करत असलेल्या कामाचा मोबदला आपणास काय ,किती  मिळतो. यावर कामाचे समाधान अवलंबून असते.

आपण केलेल्या (Work) कामाचे स्वरूप आणि आपल्याला सोपवलेल्या जबाबदारी याचे महत्व लक्षात घ्या , आपण महत्वाचे काम करीत आहोत हे जाणवले कि आपले काम करण्याचा हुरूप वाढतो.

कामाचे प्राधान्यक्रम ठरवा एकाचा वेळी अनेक (Work) कामे करत बसू नका अशा  वेळी आपणावर सोपवलेल्या

कामाचे महत्व आणि कामाची मुदत याचा अभ्यास करून काम योग्य वेळेत पूर्ण करा.

अनेक कामे हाती घेण्यापेक्षा एक काम पूर्ण करा आणि मगच दुसऱ्या कामाला सुरुवात करा.

कामाचा असणारा ताण तणाव टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी परिवारासोबत तसेच मित्रमैत्रिणी सोबत वेळ घालवा .

जेणेकरून तुम्हाला काम करण्याची नवी उर्जा निर्माण होईल.

हे सगळ लिहण्याचे ,सांगण्याचे तात्पर्य एवढेच कि काहीतरी काम करा.उगाच बसून वेळ घालवू नका .आपल प्रत्येक काम आपल भविष्य उज्ज्वल करण्यास मदत करेल .

एक उनाड दिवस

Business Idea Ekउनाड दिवस