भटकंती

भटकंती

नमस्कार मित्रानो,

मी आणि माझा मित्र काही दिवसापूर्वी  आम्ही गावाला फिरायला गेलो होतो .गावाजवळ जंगलामध्ये एक धबधबा आहे तेथे आम्ही गेलो . खूप सुंदर धबधबा (waterfall )आहे. निसर्गरम्य वातावरण आजूबाजूला खूप झाडे झुडपे , पक्षांचा चिव-चीवाट, गुरे चरताना दिसले. खूप सुंदर वातावरण होते . लहान मुले नदीमध्ये मस्त पोहत होते , उड्या मारत होते .

पोहण्याचा मनमुराद आनंद घेत होते . बाजूलाच एक माणूस मासे पकडण्यासाठी जाळे टाकत होता . पुढे काही अंतरावर अजून एक मासे पकडण्यासाठी नदीच्या एका कोपऱ्याला दगडाचा छोटासा बांध घातला होता , त्यामधून थोडेसे पाणी जाईल अशी व्यवस्था केली गेली होती. जेथून पाण्याचा प्रवाह जात होता तेथे एक बांबू पासून तयार केलेले एक जाळे विणले होते .

ते व्यवस्थित पणे तेथे लावले होते .मला उत्सुकता लागली कि त्यांनी ते कसे बनवले . त्यांनी मला तेथेच काही अंतरावर  असलेल्या वस्ती मध्ये नेले . जेमतेम पाच ते सहा झोपड्या असलीत त्यामध्ये जनावरे बांधण्यासाठी  गोठ्याची व्यवस्था होती . बाजूलाच एक छोटीसी विहीर होती . विहीर म्हणजे त्यांनीच पिण्याचे पाणी पिण्यासाठी खोदलेला एक खोल खड्डा . आजूबाजूला बांबू भरपूर होते ,मी पुढे गेलो त्यांची राहण्याची जागा व बाहेरील अंगण खूप सुंदर शेणाने सारवलेले होते.काही माणसे बांबूच्या टोपल्या बनवण्यात व्यस्त होते .

मी थोडीशी विचारपूस केली कि हे सगळ कसे बनवले जाते . त्यांनी सांगितले कि ओला बांबू चिरायचा त्यापासून बारीक बारीक चीपाट करायचे, त्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात , जसे कि  मासे पकडण्यासाठी ,साटे ,भोत, खेकडे पकडायला मुडा , मळी, भोक्षी,  बनवली जातात (हे आमच्या भाषेतील शब्द आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळे शब्द असतील). तसेच सूप ,छोट्या मोठ्या टोपल्या, काही पदार्थ पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुकण्यासाठी चुलीच्या वरती राहील असा सपाट बांबू पासून चटई विणली होती .

उन्हाळ्यात पाला जमा करण्यासाठी काठी तसेच मोठी टोपली त्याला आम्ही पाटी असे म्हणतो.  तसेच बांबू पासून बसण्यासाठी एक टेबल तयार केला होता .

……धन्यवाद

Share
Translate »