Enjoy Life With Good Health

Enjoy Life With Good Health

स्वछंद जीवन जगा

(If you Listen Audio Please Click Here)

आज या धकाधकीच्या जीवनात आज आपण स्वतःला विसरलो आहोत. कामाच्या तान तणावामध्ये आपण स्वतः तसेच परिवारला,  मित्र -मैत्रीणीना वेळ देवू शकत नाहीत.

जीवन  खूप सुंदर आहे ते वाया घालवू नका ते मनमुराद जगा स्वतःला वेळ द्या , स्वताची काळजी घ्या.

एक दिवस सर्व काही सोडून स्वतःला जस वाटत जस पटत तस स्वछंद जीवन जगून बघा मग कळेल जग किती सुंदर आहे आणि आपण कोणत्या तो अनोळख्या जीवनात जगत आहोत त्याचा अंदाज येईल . Enjoy Life With Good Health.

सुट्टीच्या दिवशी घरचे काम करत बसावं लागत . मनमोकळ्याने फिरता येत नाही.

आपल्या अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. त्या आता पूर्ण करा आणि आनंदी राहा.

चित्रपट गृहात जावून चित्रपट बघावेसे वाटतात. नाटके बघावेसे वाटतात. Enjoy Life करावीशी वाटते.

मैदानात जावून खेळावेसे वाटते , चौपाटीवर जावून पाणीपुरी,भेळपुरी खावीशी वाटते.

कधीतरी या रोजच्या दैनंदिन कामाच्या  दुनियेच्या बाहेर जावून स्वछंद भटकावे ,

डोंगरावर जावे निसर्गाचा आनंद लुटावा असे वाटते, गाडी घेवून कुठे तरी लांब फिरायला निघून जावे असे वाटते जेथे कोनीही आपल्याल त्रास देणारा नको.

आपल्या आवडीच्या खाद्य पदार्थ मनमुराद खात फिरावे .झाडावर चढून  आंबा,चिंच इतर फळे  तोडून खावेसे वाटते माळावर,शेतामध्ये,जंगलात फिरावेसे वाटते.

गरमीच्या दिवसात बर्फात जावून खेळावेसे वाटते आणी थंडीच्या दिवसात गरम पाण्याच्या कुंडात डूबावेसे वाटते.  

थंडीच्या दिवसात सर्वत्र धुके दिसते जणू आभाळच खाली आले आहे असे भासते .

त्या आभाळाच्या जणू चादरच सर्वत्र पसरलेली असते . त्या चादरीवर जणू आपल्याल चालावेसे वाटते , तो मऊ स्पर्श आपल्याल हवा हवासा वाटतो. Enjoy Life.

कधी कधी वाटते कि काय कामाचा तो पैसा, या पैशाने सगळ्याच गोष्टी विकत घेता येत नाही जे घेता येते ते  क्षणिक सुख असते .

आपले जिवन कायम चिरतरुण राखतो तो  म्हणजे निसर्ग, हा निसर्ग आपल्याकडून कसलीच अपेक्षा करत नाही न कसली मोह माया दाखवत. निसर्ग आपल्याला भरभरून प्रेम देतो.

निसर्गाच्या सानिध्यात जावून निवांत बसावेसे वाटते .

कधीतरी आपण कुठे तरी कामा निमित्ताने बाहेर जातो . जाताना रस्त्यालगत  माळरानावर सुंदर रंगबिरंगी फुले फुललेली दिसतात , फुलपांखरे ,पक्षी उडताना दिसतात.

अशा  वेळीस आपल्याला  गाडीतून उतरून त्या माळ रानावर फिरायला जावेस वाटते. नदी ,नाले झरे बघताना त्या पाण्यामध्ये स्वछंद पोहावेसे  वाटते. मासे पकडावेसे वाटते . पाण्यात पाय टाकून बसावेसे वाटते.

कधी कधी फिरण्याचा मोह आवारात नाही परंतु आर्थिक परिस्थिती मुळे आपण आपल्या स्वप्नातल्या आवडीच्या ठिकाणी जावू शकत नाहीत ,परंतु आपल्या आजूबाजूला असणाऱ्या निवांत ठिकाणी आपण नक्की जावू शकतो फिरू शकतो . तिथे जावून आनंद घेवू शकतो.

जिवन खूप सुंदर आहे ते वाया घालवू नका ! 

मोकळ्या जागेवर जावून कोणीही नसलेल्या ठिकाणी जोरजोरात ओरडावेशे  वाटते, जोरजोरात रडून सगळ आपल्या मनातील दुख: हलक करावेस वाटत.

गावाकडे जावून बाहेरच्या मोकळ्या अंगणात झोपवेसे वाटत ,एकटक आकाशात बघून ग्रह तारे मोजवेसे वाटतय, तुटणारा ताऱ्याची वाट बघावीशी वाटते.

सकाळ- संध्याकाळी पक्षांच्या चिवचिवाट ,कोकीळाचा मंजुळा आवाज ऐकावासा वाटतो.  

समुद्र किनारी जावून वाळू मध्ये खेळावेसे वाटते, वाळूचे डोंगर करावेशे वाटतात. त्या थंड हवेमध्ये मनमोकळेने फिरावेसे वाटते. बोटीत बसून लाटांवरती स्वार व्हावेसे वाटते..

स्वछंद जीवन

गावातील जत्रा, यात्रा, समारंभ  यात फिरावेसे वाटते , आपण बारीक होवून पाळण्यात बसावेसे वाटते ,  आई – बाबांकडे लहान मुलांसारखा हट्ट करून आईस्क्रीम, खेळणे ,फुगे घ्यावेसे वाटतात.  

Sukhand Jivancha Anand

आपण लहान असताना कदाचित सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तेव्हा आपण कुठे आई – बाबांच्या सोबत फिरायला गेलो असता आपल्याल हवी असलेली खेळणी भेटली असतीलच  असे नाही तेव्हा आपण रडत बसायचो,

आणि आज आपल्याकडे पैसा आला आहे तर तो क्षण आपण परत आणू शकत नाही पूर्वी आवडलेले खेळणे आता आपण  घेवू शकतो पण तो आनंद आपण परत मिळवू शकत नाही.

Sukhi JIvanacha Mantra

आजच्या दुनियेत आपण स्वतः ला वेळ देत नाही आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहोत , सकाळी लवकर उठून व्यायाम करावा , योगासन करावे ,मोकळ्या वातावरणात फिरून यावे ज्या मुळे आपले स्वास्थ चांगले टिकून राहते .

वा आपण पूर्वीपेक्षा जास्त तेजस्वी दिसू लागतो. या सुंदर जीवनाचा चांगला अनुभव प्रत्यक्षात घेवू शकतो.

Ekउनाड दिवस