Feel Happy

Feel Happy

आनंद शोधा

(Happiness if You listening Audio Podcast Click Here)

आनंद (happiness) म्हणजे काय तर काही तरी कार्य करून त्यानंतर मिळणार समाधान  काहीतरी मिळविण्याची जिद्द आणि ज्यासाठी आपण अनेक महिने, वर्षापासून जी काही धडपड करत असतो ते एकदा  मिळाले कि मन शांत होते ,

अंगात नव चैतन्याचे वारे वाहू लागतात , डोक एकदम शांत हलक होवून जाते.

अंगात एक वेगळी सळ सळ निर्माण होते.

आनंद (happiness) हा मोठ्या मोठ्या गोष्टीत न शोधता लहान लहान गोष्टीत शोधावा . life is very short

जेणेकरून त्रास कमी होतो.आपणास जे  मिळवायचे असेल ते जिद्दीने मिळवा ,

जेणेकरून ज्या दिवशी आपला विजय होईल तो दिवस आपल्या कायमचा स्मरणात राहिला पाहिजे.

आनंद हा अनेक वेळी होतो.

आपले ध्येय पूर्ण केल्याने

आपण अनेक वर्षापासून कोणती न कोणत्या गोष्टी साठी प्रयन्त करत असतो. उदा. नोकरी ,व्यवसाय , अपेक्षित असलेले यश,शिक्षण, बाहेर देशात जाण्याचे स्वप्न तसेच अनेक इच्छा मनात बाळगून असतो .

आणि ते स्वप्न सत्यात कधी उतरेल यासाठी आपण सतत  प्रयत्नशील असतो.

सत्यात ते स्वप्न  उतरल्यास त्या गोष्टीचा आनंद , नव चैतन्याची पूर्ती होते. feel happy

नवीन वस्तू घेतल्याने

आपण खूप दिवसापासून एखादी वस्तू घेण्याचा विचार असतो परंतु आर्थिक परिस्थिती मुळे, किंवा योग्य वेळ नसल्यामुळे आपण ती वस्तू विकत घेऊ  शकत नाहीत किंवा मिळवू शकत नाही  .

परंतु आपली जेव्हा परिस्थिती होते,

आणि आपल्याला हवी असलेले गोष्ट आपण जेव्हा घेतो तेव्हा चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आनंद निर्माण होतो,काहीतरी मिळाल्याचे समाधान भेटते.

नवीन स्थळी भेट दिल्याने

हल्ली प्रत्येक जन कोणत्यानी कोणत्या कामामध्ये गुंतलेला असतो उदा.शेती,नोकरी,व्यवसाय .

रोजचे काम करून आपण कंटाळून जातो. कधीतरी वेळ काढून कुठेतरी फिरायला गेल्यामुळे आपला थकवा दूर होतो.

यामुळे मित्रांना,घरच्या माणसासोबत आपण निवांत क्षण घालवू शकतो. आपल्यावर असणारा ताण यामुळे कमी होतो व आपण उत्साही बनतो. एक नवीन उर्जा आपल्या शरीरात निर्माण होते. feel happy

दुसऱ्याला मदत केल्याने

आपण काम करून आपला उदरनिर्वाह करतो .काम करून आपले घर चालवतो ,

परंतु जे काम करू शकत नाहीत किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्याला आपण जरूर मदत करू शकतो .

आज अनेक ग्रामीण भागात संस्था कार्य करतात .ज्या मध्ये अनेक तरुण-तरुणी काम करतात.शहरातून देखील अनेक जन ग्रामीण भागात येऊन मदत करतात .

सणासुदीच्या काळी फराळ देणे ,कपडे देणे ,तसेच इतर मदत करण्याचे कार्य करतात त्यामध्ये आपण देखील आपला सहभाग नोंदवू शकता.

आपण चालत असतांना आपल्याला एखाद व्यक्ती रस्ता तसेच पत्ता विचारतो , त्याच प्रकारे आपण अनेक लोकांना अशा बारीक बारीक मदत करत असतो. ज्या मधून आपल्याला आनंद मिळतो, काहीतरी चांगले केल्याचे समाधान प्राप्त होते.

दुसऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन केल्याने

आपण केलेल्या मेहनती मधून आपण यश मिळवतो किंवा आपल्याला वरिष्ठ लोकांचे मार्गदर्शन भेटलेले असते.

परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक जन असतात त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही जसे कि स्पर्धा परीक्षा,शिक्षणाचा योग्य पर्याय,व्यवसाय मार्गदर्शन तसेच इत्यादी.

त्यांना योग्य सल्ला न भेटल्याने ते वाट भरकटत जातात . आपण आपल्या आजू बाजूला असलेल्या मित्रांना आपल्या परीने मार्गदर्शन केले , तसेच योग्य सल्ला दिला , थोडी आर्थिक मदत केली तर तो व्यक्ती इतरत्र न भटकता त्याच्या ध्येयाकडे नक्की वाटचाल करेल.

अनेक समारंभात उपस्थित राहिल्याने

आपल्या आजूबाजूस अनेक समारंभ होतात. आपण त्या समारंभ उपस्थिती नोंदवली पाहिजे . तेथे आपले मित्र ,परिवारातील सदस्य यांची भेट होते.

नवीन मित्र तयार होतात . रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आपणास निवांतपणा मिळतो .

मित्रांच्या ,परिवाराच्या सोबत चांगला वेळ घालवता येतो, अशा वेळीस मन हलके होते.

आपण आनंद (happiness) मोठ्या गोष्टीत न  शोधता लहान गोष्टीत शोधा जेणेकरून एखादी गोष्ट साध्य केली तर

त्याचा आंनद खूप मोठा असेल आणि ठराविक गोष्ट साध्य करू शकलो नाही तर दुख: हे कमी होईल.   feel happy

Ekउनाड दिवस