Ganesh Chaturthi 2020 in Marathi Information

Ganesh Chaturthi 2020 in Marathi Information

गणपती बाप्पा मोरया. Ganpati Bappa Morya

जगात कोरोनाचे संकटपासून सर्वजण त्रस्त आहेत . सर्वजण भीतीपोटी घरातच आहेत व जे कोन्ही घराबाहेर पडत आहेत ते आप आपली काळजी घेताना दिसत आहेत.

गणपती बाप्पा हे आपले आराध्यदैवत आहे.

Lord Ganpati

गणपती हा केवळ भारतात नव्हे तर अफगाणिस्तान ,नेपाल,तिबेट ,जपान श्रीलंका इंडोनेशिया अशा कितीतरी अनेक  देशामध्ये पुजला जातो.

गणपती आले यावेळी कोरोनाचे सावट सर्वत्र आहे तरीही यावर्षी सगळेच गणपतीच्या स्वागतासाठी तितकेच उत्सुक व उत्साही आहेत.सजावट करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घेण्यासाठी बाजारात काही प्रमाणात गर्दी दिसते आहे .

आता लोकांच्या मनातली भीती निघून गेली आहे . गणेश हि विद्देची देवता व संकटाचे निवारण करणारी देवता म्हणून मानली जाते.

हा महाराष्ट्रातील मोठा उत्सव आहे . श्री गणेशाला दुर्वाची माळ केली जाते,देवासमोर लाल रंगाची फुले ठेवली जातात तसेच लाल फुलांचा हार  देखील घातला जातो  . मोदक तयार करून नैवद्य म्हणून दाखवलं जातो , त्यानंतर गणेश आरती  गायली जाते व सर्वाना प्रसाद म्हणून वाटला जातो.

गणपती चा मखर बनविण्यासाठी घरातले सर्व जन तयारीला लागलेल असतात . मखर बनविणे तसेच  टेबल, पाट,रुमाल,दुर्वा,केळी,सफरचंद दुध दही साखर कापूर,अगरबत्ती,इत्यादी सामानाची जमवा जमव करण्यास सुरुवात होते. गणपती बाप्पाच्या आगमनाने घरातले वातावरण प्रसन्न व अल्ल्हादायक वाटू लागते . घरात पाहुनी मंडळीची रेलचेल चालू होते. दर्शनासाठी अनेक गावातली लोक येत असतात. वर्षातला कदाचित हा एक दिवस असतो जेव्हा गावातली मंडळी हि आपल्या घरी येत असतात.

उखडीचे मोदक , तळलेले मोदक यांची चव तर लाजवाब. जे कदाचित गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात बनवले जातात.

Ganesh Chaturthi

घरगुती गणपती हे दीड दिवस ,अडीच दिवस व जास्तीत जास्त पाच दिवस असतात.

तर सार्वजनीक गावाचे ,मंडळाचे गणपती हे ५ दिवस,१० दिवसाचे असतात.  

गणपतीचे दिवस म्हणजे मौज मजा,आनंद ,प्रसन्न वातावरण .

महाराष्ट्रातील अष्टविनायक !! Ashtavinayak Ganpati

मोरगावचा श्री.मयुरेश्वर

सिद्धटेकचा श्री. सिद्धेश्वर

पालीचा श्री.बल्लाळेश्वर

महाडचा श्री.वरदविनायक

थेवूरचा श्री.चिंतामणी

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

ओझरचा श्री विघ्नेश्वर

रांजणगावाचा श्री महागणपती  

महाराष्ट्रात अनेक गणपतीचे मंदिरे आहेत. तसेच देश विदेशात आहेत.

गणपत्ती बाप्पाची आरती , त्यानंतर मिळणारा प्रसाद यासाठी बच्चेकंपनी खूप आतुर असते . त्यानंतर रात्री गौरी गणपतीची गाणी व या पारंपारिक गाण्यावर नाचणे याने रात्र कशी निघून जाते हे कळतच नाही.

Ekउनाड दिवस