शेळीपालन

Goat Farming Best Business


शेळी पालन हा एक उत्तम व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. सध्याचा बेरोजगारपणा , नोकरीच्या वाढलेल्या स्पर्धा , यामध्ये उत्तम मार्ग म्हणजे छोटा-मोठा व्यवसाय करणे नेहमीच चांगले असते . अनेक सरकारी योजनेचा लाभ घेवून बँकेतून आपण कर्ज, अनुदान मिळवता येते.

शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालन व अर्धबंदिस्त शेळीपालन करता येते . शेळी पालनामध्ये सुरुवातील अनुभवासाठी देशी शेळी पालन केल्यास ते फायद्याचे ठरते. चांगला अनुभव येतो, नुकसान कमी होते.

शेळयांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाई , म्हैस व इतर जनावरे यांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. शेळयांच्या आरोग्याचे , निवार्‍याचे व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्यासाठी लागणारा चारा हा शेळयांना शेड मध्येच पुरवला जातो. बंदिस्त शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी मोकळ्या जागेवर सोडता येतात. त्यामुळे खाद्याची बचत होते.

शेळीपालनाचे फायदे

हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीनेही केला जाऊ शकतो.

काही जातीच्या शेळ्या या 14 ते १५ महिन्या मध्ये दोनदा पिलांना जन्म देतात यामुळे अधिक उत्पन्न मिळते.

शेळ्यामध्ये दोन पिलांना जन्म देणाची क्षमता अधिक असल्याने अधिक उत्पन्नासाठी फायदेशीर आहे.

शेळी हा प्राणी काटक असतो.

त्यांच्या विष्ठेचे उत्तम खत होते.

बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे,यांचे मांस चविष्ट असते.

शेळ्यांच्या जाती

भारतीय जाती

भारतीय शेळ्या ह्या कमी खर्चात देखील उत्तम उत्पादन देतात. भारतात बकऱ्यांच्या सुमारे २५ जाती आहेत बिटल, सुरती,मारवाडी, बारबेरी वगैरे जाती दूध उत्पादनास तर बिटल, उस्मानाबादी,सुरती,संगमनेरी, अजमेरी वगैरे जाती मांसासाठी वापरल्या जातात. यांची वाढ मंद गतीने म्हणजे वर्षास सुमारे २५ किलो इतकी होते.

विदेशी जाती

सानेन, टोगेनबर्ग,अल्पाईन,एग्लोन्युबियन, अंगोरा या बकऱ्यांच्या विदेशी सुधारीत जाती आहेत. यांची वाढ झपाट्याने होते. बोयर जातीच्या शेळ्या वजनदार आहेत. नराचे वजन १०० ते १२५ किलो व मादिचे वजन सुमारे ९० ते १०० किलो असते.

बंदिस्त शेळीपालन

शेळ्यांची चरण्याची पद्धत ही इतर गुरांपेक्षा वेगळी असते.त्या केवळ झाडांची पाने व कोवळे शेंडे, खुरटे वनस्पती खातात . बंदिस्त संगोपनात शेळ्यांची झपाट्याने वाढ होते.यासाठी वातावरणापासून संरक्षणासाठी त्यांचेसाठी शेड आवश्यक आहे. .याशिवाय शेड बाहेर शेळ्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा असावी.

शेड मध्ये चारा, पिण्याचे पाण्याची आधुनिक सोयी असाव्यात.गाभण, आजारी, पिल्ले, बोकड यांचे साठी वेगवेगळे कप्पे असावेत.

शेळ्या वेल्यानंतर त्यांना व पिलांसाठी कप्पे असावेत.

प्रथमोपचार व औषधांसाठी वेगळी सोय असावी,वेळेवर लसीकरण गरजेचे असते.

शेळ्यांना चारा हा तुकडे करून द्यावयास हवा,शेळ्यांचे लसीकरण व जंतूनाशकांचा योग्य वापर करावा.

तेथील शेळ्यांचा विमा काढण्यात यावा,शेड हा ऊन, पाऊस, थंडावा यापासून सुरक्षित असावा.

अर्धबंदिस्त शेळीपालन

शेळ्या या विशेषत: फिरणारे जनावर म्हणून ओळखले जाते. यामुळे जर शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले तर त्यांना विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती खाद्यामध्ये मिळतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते तसेच खाद्यही कमी लागते. शेळ्यांना मोकळे सोडल्यास फिरुन चारा व खुरटे वनस्पतींचा ,तसेच झाडपाला खाण्याची सवय असते.

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे फायदेबाहेरचा झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत.

व्यवस्थापन, गोठा बांधणी व देखभाल खर्चात बचत होते.

शेळ्यांचा आरोग्य चांगले राहते.

आहार

शेळ्याना आहारात लुसलुशीत पाला,खुराक देता येते. त्यांना प्रथिनयुक्त आहार पुरेश्या प्रमाणात द्यावयास हवा,शेळ्यांची पिलांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते यासाठी पिलांना जास्तीत जास्त दुधाची गरज असते, त्यामुळे शेळ्यांना हिरव्या चाऱ्या बरोबर योग्य प्रमाणात खुराक देणे खुप गरजेचे आहे यामध्ये दूध वाढीच्या पशु खाद्य तसेच मका ,तुरीचा भरडा यासारखा खुराक देणे गरजेचे आहे.खुराकामधे शेंगदाणा पेंड ,भरडा, सरकी पेंड असावी.

शेळ्याना आहारात लुसलुशीत पाला,खुराक देता येते. त्यांना प्रथिनयुक्त आहार पुरेश्या प्रमाणात द्यावयास हवा,शेळ्यांची पिलांचे वजन सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात वाढते यासाठी पिलांना जास्तीत जास्त दुधाची गरज असते, त्यामुळे शेळ्यांना हिरव्या चाऱ्या बरोबर योग्य प्रमाणात खुराक देणे खुप गरजेचे आहे यामध्ये दूध वाढीच्या पशु खाद्य तसेच मका ,तुरीचा भरडा यासारखा खुराक देणे गरजेचे आहे.खुराकामधे शेंगदाणा पेंड ,भरडा, सरकी पेंड असावी.

Business Idea