अंगणातील झाडे

अंगणातील झाडे

The Miracle Of Home Garden.

घर जेथे मनुष्य राहतो या घरात टीव्ही ,फ्रीज,फर्निचर,दैनंदिन गरजेच्या वस्तू असतात.या सर्वांमुळे घराला घरपण येते. घर हे मातीचे,लाकडी,सिमेंट विटाचे असते.

घराच्या समोर तसेच पाठीमागे जी जागा शिल्लक असते त्याला आपण अंगण असे म्हणतो. या अंगणात अनेक प्रकारची झाडांची लागवड केली जाते.

Gharatil Bagicha

आपण झाडांची लागवड हि जागेच्या अभावी  कुंड्यांमध्ये , बाटल्यामध्ये ,टबामध्ये,जुन्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये,मातीच्या कुंड्यांमध्ये झाडांची लागवड करू शकतो, या मध्ये तुळस, फुलझाडे,कोरफड,तसेच इतर आकर्षक लहान झाडांचा समावेश असतात.

 हल्ली बोन्साय हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. या मध्ये झाडांची उंची कमी केली  जाते. ज्या प्रमाणे एखादे विशाल झाड जसे वड,पिंपळ,आंबा वाढतात त्याचप्रमाणे या बोन्साय झाडामध्ये त्याची उंची कमी करून त्याची प्रतिकृती तयार केली जाते.

click here to listening Marathi podcast

घरामध्ये,खोलीमध्ये,ब्लॉकमध्ये अनेक निर्जीव वस्तूचे भंडार असते त्यामध्ये जर एखादी सजीव वस्तू असल्यास मन प्रसन्न होते. जसे कि झाडे कोपऱ्यात,टेबल वर ठेवू शकता, बाल्कनी मध्ये , खिडकीमध्ये, टेरेस वर  कुंड्या मध्ये लागवड करू शकता . त्यांना पुरेसा सूर्य प्रकाश मिळेल अशी काळजी घ्यावी. जे वातावरण  प्रसन्न करण्यास मदत करतात.

त्याच प्रमाणे आपण जर गावाकडे राहत असू किंवा शेतावर घर असेल तर आपल्या घराच्या भोवती वाडा असतो ज्याला कुपन केले जाते . हे कुंपण झाडाच्या फाद्याने तसेच लोखंडी जाळीने,तारानी बनवले जातात.

शहरात राहणाऱ्या लोकांना पण आपल्या आजूबाजूला झाडे,फुलझाडे असावीत अशी प्रखर इच्छा असते .

Home Garden ideas

फळझाडे

अंगणामध्ये पेरू,चिकू,आंबा,चिंच,सीताफळ,रामफळ,बोर,शेवग्याच्या शेंगाचे झाड,केळी,जाम,इत्यादी अनेक प्रकारचे फळ झाडांची लागवड करावी.

फुलझाडे

त्याचप्रमाणे सुंदर फुलांची लागवड करावी.

गुलाब,रातराणी,मोगरा,जास्वंद,सदाफुली,चाफा,तगर,कण्हेर,आबोली,घाणेरी,इत्यादी अनेक फुलझाडे असतात.

औषधी वनस्पती

त्याचप्रमाणे औषधी वनस्पती जसे तुळस,कडुलिंब,कोरफड,गवती चहा,आवळा,अडुळसा,निर्गुडी,पानफुटी, इत्यादी झाडांची लागवड करावी.   

पालेभाज्या

भाज्यांचा विचार करून भेंडी,गवार,टोमेटो,दोडकी,पडवळ,काकडी,घोसाळी,पापडी,वांगी,मुळा,गाजर,कोबी,फ्लावर भोपळा,वेलभाज्या इत्यादी ची लागवड आपण करू शकतो .

Everything You Need To Know About How To Develop Home Garden.

जमिनीत झाडांची लागवड करत असताना

फुल झाडे,फळ झाडे,वनस्पती इत्यादीची लागवड करत असताना खड्डा खोदावा . त्या खड्यामध्ये दगड असल्यास काढून टाकावेत.

शेणखत तसेच इतर खत वापरावे.

झाडे लावल्यानंतर माती निट व्यवस्थित दाबून घ्यावी कुठेही खाच खळगा राहणार नाही याची काळजी घ्यावी.

झाडे लावून झाल्यानतर पाण्याचा वापर योग्य प्रकारे करावा.

झाडांवर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी करावी.

अनावश्यक फांद्या काढून टाकावेत.

घराजवळ मोठ्या झाडाची लागवड करत असताना योग्य अंतर राखावे जेणेकरून त्याच्या मुळापासून  आपल्या घराला धोका निर्माण होऊ नये.

जमीन हि मुरमाड,चिकट,चुनखडी,दगडाळ असते ती  त्या भौगोलिक भागावर अवलंबून असते. त्यामुळे त्याभागानुसार कोणती झाडे लावावीत त्याचा निर्णय घ्यावा जी  झाडे पर्यावरणीय दृष्टीने वाढणार नाहीत किंवा त्या भागात होणार नाहीत त्या झाडांची निवड करू नये.

घराच्या आजूबाजूला काटेरी झाडे असू नयेत.

हेही वाचा .

रानमेवा

बोन्साई झाड

जगातील पाच शिकारी वनस्पती

Ekउनाड दिवस