घर पहावे बांधून लग्न पहावे करून हि मराठी मधील म्हण आहे . यानुसार आपण एखादे काम हातात घेतले कि अंदाजापेक्षा जास्त खर्च येतो.

Ghar Bandhun Pahave Ani Lagn Karun

प्रत्येकाचे स्वप्न असते कि आपलेही स्वतंत्र घर असावे त्यामध्ये आपल्या आवडी निवडीच्या वस्तू असाव्यात .

रंगरंगोटी , अनेक वस्तूची सजावट त्याचप्रमाणे फर्निचर यासारख्या अनेक गोष्टी यामध्ये असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते .

सुरुवातील घर बांधण्यासाठी लागणारी जागा , घराची दिशा ,दरवाज्याची दिशा त्याचप्रमाणे खिडक्या कोणत्या दिशेला पाहिजेत , स्वयपाक गृह ,देवाची खोली , हॉल ,बाथरूम इत्यादी गोष्टी ध्यानात ठेवून घराची रचना करावी लागते .

घरासाठी लागणारे साहित्य वेळेवर उपलब्ध झाले पाहिजे , रेती ,सिमेंट ,विटा ,लोखंड , खिडक्या लादी , दरवाजे इत्यादी वस्तू वेळेवर असलेले बर !

घर बांधून झाले कि घराची सजावटीचा प्रश्न उभा राहतो .रंग रंगोटी , घराच्या आतला बाहेरचा रंग, रंग लावण्यासाठी लागणारे रंग, ब्रश, इत्यादी सामान आवश्यक असते , घराला लागणारे पत्रे,कौलारू घर असेल तर कौल इत्यादि गोष्टीची आवश्यकता लागते.

घरात लागणारे टेबल ,सोफा , खुर्च्या ,पाट,चौरंग ,बाकडा ,पलंग ,पाळणा इत्यादी गोष्टी लागतात.

घरात रंग लावताना रंगसंगती जुळली पाहिजे कोणत्या भिंतीला कोणता रंग लावायचा ,त्याचप्रमाणे आता भिंतीला लावायला रंगबिरंगी वॉलपेपर,स्टीकर भेटतात. जे खूप आकर्षक असतात.

गावाकडचे घर

घराच्या अवती भोवती मोकळी जागा असायला पाहिजे, प्रशस्थ अंगण असावे . घरासमोर तुळशी वृंदावन पाहिजे अंगणात वेगवेगळ्या फुलांची झाडे असावीत त्यामुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहते.

आजूबाजूला वेगवेगळ्या फळांच्या झाडांची लागवड करावी जसे कि पेरू,आंबा, सीताफळ,रामफळ,चिकू,नारळ,लिंबू,जांभूळ,काजू,केळी इत्यादी झाडे असावीत . जेणेकरून आजूबाजूचा भाग हिरवागार असावा .घराभोवती सावली असावी ,फळ झाडांमुळे घरच्या घरी फळे खावयास मिळतील.

घराच्या समोर अंगण प्रशस्थ असावे जेणेकरून कोणताही कार्यक्रम करताना अडचण येणार नाही.

घराला लागून जनावरे बांधण्यासाठी लागणारा गोठा बांधावा.

पाणी साठवणूक करण्यासाठी लहान हौद बांधावा ,यामुळे फुलझाडे,फळझाडे यांना पाणी देण्यास मदत होईल.

घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आपण कितीही मोठे झालो पैसा कमावला तरी एक दिवस आपण आपल्या गावी येतोच , गावाला लहान मोठे घर बांधतोच . गावाच्या वातावारणामध्ये जी गमंत आहे ती शहरामध्ये नाही . मोकळे वातावरण, गजबज गोंगाट नाही , आनंददायी वातावरण , निवांतपणा हा गावालाच उपभोगता येतो .

Click Here to listen Marathi Podcast

Written By

EkUnadDiwas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »