How To Make Time At Home During Lockdown

How To Make Time At Home During Lockdown

 

घरी राहा सुरक्षित राहा (stay home stay safe)

घरात राहून कंटाळा आला असेल तर खालील गोष्टी करा जे तुमच्यात बदल घडवून आणतील.

20 ways

मित्र –   जुन्या शाळा,कॉलेज, ऑफिस तसेच इतर  मित्रांना फोन करा, नातेवाईकाशी फोनवर बोला. खूप दिवसांनी बोलल्यावर जुन्या गोष्टी ताज्यातवान्या होतील.  मैत्री अजून घट्ट होईल.

अभ्यास करा –

आपण जर स्पर्धा परीक्षा,CET तसेच इतर गोष्टीची तयारी करत असणार तर हि तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

कारण सर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत ह्या वेळेत तुम्ही खूप चांगला अभ्यास करू शकता.अभ्यासक्रम नीट समजून घ्या .घरात असणाऱ्या पुस्तकांचा आधार घ्या त्याचप्रमाणे मोबाईल ची मदत घ्या.

पुस्तके वाचा – घरात असणारी पुस्तके वाचा तुमचा कंटाळा दूर होईल,वाचनाची आवड लागेल , नव नवीन माहितीची तुमच्यात भर पडेल.

click here to listen Podcast.

ध्येय ठरावा आपणाला भविष्यात काय साध्य करायचे आहे, काय मिळवायचे आहे त्याचे प्लॉनिग करा.

प्लॉनिग करताना लिखित स्वरूपाचे करा जेणेकरून ते लक्षात राहील, सर्व गोष्टी मुद्देसूद मांडा.तुमचे योग्य प्लॉनिग तुमचे ध्येय गाठण्यास मदत करेल.

आठवण – जुन्या गोष्टी आठवा.लहानपणीचे दिवस आठवा , घरातील फोटो अल्बम काढा ते फोटो बघता बघता तुमच्या चेहऱ्यावर नक्की स्मित हास्य उमटेल.

कला शिका – जो वेळ मिळाला आहे ह्या वेळेत तुम्ही कला शिकू शकता, चित्रकला,नृत्यकला, स्वयपाक,गाणे,कविता,एखादे वाद्य वाजवणे,घरात जर संगणक उपलब्ध असेल तर इतर सदस्यांना संगणक शिकवा.

व्यायाम करा- कामाच्या धकाधकीच्या वेळेत तुम्हाला कधी व्यायाम करण्यास पुरेसा वेळ मिळाला नसेल . तर या संधीचा फायदा घ्या घरातच व्यायाम करा.

त्याचप्रमाणे काही अडचणी आल्यास यु ट्यूब च्या माध्यमातून इतर स्टेप शिका .

योगा – घरात योगासना करा व इतर सदस्यांना सुद्धा शिकवा त्याचप्रमाणे काही अडचणी आल्यास यु ट्यूब च्या माध्यमातून इतर स्टेप शिका .

पाककला – स्वयपाक करून बघा . येत नसलेले पदार्थ बनवून बघा. घरच्या मंडळीना स्वयपाकात  मदत करा.

खेळ घरच्या मंडळी, लहान मुलांसोबत खेळ खेळा, कॅॅरम,बुद्धिबळ,गाण्याच्या भेंड्या तसेच इतर खेळ खेळा.

मुलाचा अभ्यास मुले कुठे कमी पडतात, त्यांना अभ्यास करताना कोण कोणत्या अडचणी येतात याचे त्यांना मार्गदर्शन करा , मुलांना अभ्यास करण्यास प्रोत्साहित करा.

तसेच इतर अभ्यासाची,गोष्टीचे पुस्तके वाचण्यास आवड निर्माण करा.

कपडे –  कपड्याचे विगतवारी करा. जुने कपडे बाजूला करा.कामाच्या धावपळीत कपाटात कोंदलेले कपडे व्यवस्थित करा.

नवीन भाषा –  आपली मातृभाषा ज्या पद्धतीने आपण स्पष्ट बोलतो त्याचप्रमाणे एखादी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. भारतात तसेच जगात अनेक भाषा आहेत,

नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही इंटरनेट चा वापर करा.

माहिती – आपल्याकडील माहिती इतर सदस्यांना शेअर करा.वरिष्ठ मंडळींचा सल्ला घ्या . आपले विचार मांडा.

ऑनलाइन आर्टिकल – इंटरनेट वर सर्व प्रकारचे ब्लॉग,आर्टिकल उपलब्ध आहेत ते वाचा आपल्या ज्ञानात भर पाडा. नव नवीन गोष्टी शिका. 

चित्रपट – बघायचे राहून गेलेले हॉलीवूड,बॉलीवूड तसेच इतर चित्रपट व कार्यक्रम घरच्या सोबत बसून  बघा . चित्रपट बघण्याचा आनंद घ्या.  

पॉडकास्ट – पॉडकास्ट म्हणजे जसे आपण रेडीओ,एफ एम ऐकतो त्या प्रमाणे ऑडीओ माध्यम आहे या द्वारे तुम्ही इतरांना माहिती देवू शकता.

तुमच्यातील कला तुम्ही दर करू शकता. 

शेअर मार्केट – पैसा कसा गुंतवायचा, पैशाची बचत कशी करायची  ते शिका.

पैसा शेअर मार्केट मध्ये गुंतवून  नफा मिळवू शकतो, त्याचप्रमाणे Mutual Fund मध्ये देखील पैसा गुंतवून चांगला नफा मिळवू शकतो.

घरातील कामे –  घरातील कामे समजून घ्या, घरामध्ये आवश्यक तसेच अनावश्यक वस्तूची विगतवारी करा .

अडगळीचे सामान बाजूला काढा, घरामध्ये कुठे डागडुजी करण्याची गरज  आहे का  ते बघा.

घरच्या सदस्याशी मनमोकळेपणाने बोला त्याचे मत समजून घ्या.

बगीचा – घराच्या बाजूला तुम्ही बगीचा तयार केला असेल तर झाडांच्या सुकलेल्या फाद्या तसेच अनावश्यक फांद्या काढून टाका. गवत,सुकलेला पाला याची साफ सफाई करा.

झाडांना व्यवस्थित पाणी भेटेल अशी व्यवस्था करा.बगीचा मध्ये अजून कोणती झाडे लावायची आहेत त्याची प्लानिग करा.

हेही वाचा.

अंगणातील झाडे

जल ही जीवन है! Jal Hi Jivan Hai

चक्रीवादळ

Ekउनाड दिवस