Imaginations Power In Marathi Information

Imaginations Power In Marathi Information

मन माझे असो वा तुमचे …………….मन चंचल आहे …………

(If You Listening Audio Podcast Please Click Here)

कल्पनाशक्ती

या क्षणी ते इथे असते तर दुसऱ्या  क्षणी ते दूरवर आपल्या कल्पना शक्तीच्या जोरावर ते पलीकडे असते .. आपल्या कडे असलेले कल्पनाशक्ती ते करावयास भाग पाडते. आपल्या वैचारिक शक्तीच्या जोरावर आपण मनाच्या माध्यमातून क्षणिक सुख उपभोगतो.

माझे मन

आपण उंच अवकाशात पक्षांच्या सोबतीला हवेत उडू लागतो. आपल्या आवडीच्या ठिकाणी आपण तेथे असल्याचे भासवतो . तर कधी आपण चंद्रावर फिरायला जातो तेथे चेंडू सारख्या उड्या मारू लागतो ………..ग्रहांचे फेर फटका मारून येतो.

तर कधी दूरदर्शनवर सिनेमा,गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या देशातलं दर्शन घडते तेथील पर्यटन स्थळ,उंच डोंगर दऱ्या,धबधबे,उंच उंच वृक्ष रंगबिरंगी फुले ,गार्डन,समुद्र किनारे दिसतात ….ज्या प्रमाणे ते कलाकार तेथे फिरतात त्या प्रमाणे सध्या आपण तेथे जावू शकत नाही परंतु  कल्पना शक्तीच्या जोरावर आपण मनांतून तेथे जातो तेथे फिरतो त्या ठिकाणाचा आपण अनुभव घेतो.

आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. त्यामुळे खूप काही गोष्टी करायच्या राहून जातात. कधी आपल्याला एखाद्या ठिकाणी भेट द्यायची असते , एखादे चांगले काम करायचे राहून जाते. ते कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण पूर्ण करतो व सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतो.

आपल्याला देखील विमानात फिरावास वाटत, माळ रानावर फिरावेस वाटत , ज्या प्रमाणे अधुरे राहिलेल्या गोष्टीचे स्वप्न आपण एकतर सत्यात उतरवू शकतो अन्यथा ते आपल्या कल्पना शक्तीच्या  जोरावर मनातले मनात सगळ घडवून  आणतो . प्रत्यक्ष ते घडत नसते परंतु त्याचा आनंद आपण आपल्या स्वतामध्ये अनुभवत असतो. 

Imagination Power कल्पनाशक्ती खूप मोठी आहे . आपण लहानपनी असताना गमती जमतीचे गोष्टीची पुस्तके वाचत असत त्या गोष्टीमध्ये आपण देखील एखादया पात्रामध्ये भाग घेतल्यासारख वाटत अथवा आपण ते प्रत्यक्ष अनुभवतो असे वाटते. वरिष्ठ मंडळी आपणाला गोष्टी सांगत असत ते आपण आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर स्वतामध्ये अनुभवत असत .

 त्याच प्रमाणे Hollywood मधील Adventure चित्रपटामध्ये दाखवलेले सीन हे कल्पनाशक्तीच्या जोरावर किती सुंदर रित्या मांडण्यात येतात.

आपण जे नाही आहोत….. ते .. आहे असे दाखवते ती  कल्पनाशक्ती….आणि ते साध्य करण्यासाठी हीच कल्पनाशक्ती आपणास मदत करते.

आपल्या ध्येयाची सुरुवात देखील हि कल्पनाशक्तीच्या   जोरावर होते. एक प्रकारचे आपण आपले भविष्य यातून बघत असतो . या द्वारे चांगले वाईट , तसेच संभाव्य धोके यातून ओळखता येतात.

आपण भविष्यात कोण होणार, आपण कसे वागणार,कसे ऐटीत मोटार गाडीत फिरणार,सूट –बूट घालणार , आपला बंगला कसा असणार या साऱ्या गोष्टी  आपण आपल्या मनातून घोळत बसत असतो.

दिवसभरात आपल्या मनात कितीतरी विचार येवून जातात . त्यामध्ये आपण कितीतरी नवीन गोष्टी अनुभवतो . अनेक प्रकारचे नाना विचार करत असतो. चांगल्या वाईट गोष्टीचा   त्यामधून अनुभव येत असतात. 

चांगले विचार चांगली दिशा ,चांगला मार्ग दाखवतो, भविष्यात योग्य वाटचाल करण्यास मदत करतो.

Imagination Power एवढी ताकदवान आहे कि याच्या Speed आपण मोजू शकत नाही कि आपले मन दिवसातून किती ठिकाणाहून फिरून येते.

imagination meaning in marathi – कल्पना

Ekउनाड दिवस Health