Indian Active Volcano भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी

The Secrets That You Shouldn’t Know About Indian Active Volcano

बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेटे भारताचा भाग आहे . यामध्ये अनेक लहान मोठे ३०० पेक्षा जास्त बेटे आहेत . तेथे असलेले समुद्र किनारे वनराई मनमोहक आहे. तेथील बीच खूप प्रसिद्ध आहेत.

अंदमान निकोबार बेटे हे पर्यटकांचे आकर्षक केंद्र आहे. दर वर्षी हजारो पर्यटक येथे भेटी देतात. अंदमान निकोबार येथे स्कुबा डायव्हिंग पण मोठ्या प्रमाणात केली जाते.

या द्वीपसमूहात (barren island) बॅरेन नावाचे बेट आहे हे बेट अंदमान निकोबार ची राजधानी  पोर्ट ब्लेअर पासून १४० कि.मी पासून उत्तर पूर्व ठिकाणी स्थित आहे.

तेथे एक जुना ज्वालामुखी आहे.

Indian Active Volcano  हा ज्वालामुखी मागच्या काही वर्षापासून जागा झाला असल्याचे म्हटले जाते.

बॅरेन बेटावर मनुष्य वस्ती आढळत नाही.हे बेट निर्मनुष्य आहे . १५० वर्षापासून शांत असलेला ज्वालामुखीमध्ये १९९१ या वर्षी विस्फोट झाला व पुन्हा सक्रीय झाला .

या नंतर कधी कधी येथून राख निघताना दिसते  व रात्री लावा बाहेर पडताना दिसून येतो. जगामध्ये अनेक ठिकाणी जिवंत ज्वालामुखी सक्रीय आहेत.

त्सुनामी

भूगर्भातील हालचालीमुळे भूकंप,ज्वालामुखी होतात  व त्यामुळे त्सुनामी येतात. त्सुनामी म्हणजे लाटांची मालिका होय. त्सुनामी मुळे उंच लाटा निर्माण होवून त्या समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

असेच नुकसान २००४ साली इंडोनेशिया, श्रीलंका,भारत,थायलंड व इतर काही देशात त्सुनामी आल्यामुळे झाले होते . यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले होते.

ज्वालामुखी

ज्वालामुखी हि निसर्गनिर्मित आपत्ती आहे. जमिनीत पडलेली भेग किंवा नळीसारखे भोक असते यामधून  ज्वालामुखी पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील तप्त शिलारस,उष्ण वायू,राख इत्यादी बाहेर पडतात.

शिलारस बाहेर येवून यापासून लावा आणि  राख यांचे रास साचते.यापासून जो शंकुसारखा आकार तयार होतो याला आपण ज्वालामुखी पर्वत असे म्हणतो.

ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठे भूकंप येतात.उद्रेकामुळे निघालेली राख हजार किलोमीटर दूर जावू शकते. ती राख घन व जड असते .

अशा प्रकारची राख पिकावर पडल्यास पिक नष्ट होऊ शकते . अशा प्रकारची राख फुफ्फुसात गेल्यास गंभीर आजार होऊ शकतात.

हेही वाचा.

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव

Enjoy Life With Good Health

Famous twin town India

Written By

EkUnadDiwas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »