जल ही जीवन है! Jal Hi Jivan Hai

जल ही जीवन है! Jal Hi Jivan Hai

Here’s What No One Tells You About Save Water.

आज दिवसेंदिवस पाण्याची पातळी कमी होत आहे, सर्वत्र पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.काही ठिकाणी पिण्याचे पाणी देखील पुरेसे उपलब्ध होत नाही . मनुष्य तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत फिरावे लागत आहे.

पावसाच्या अनियमितता मुळे काही ठिकाणी गंभीर दुष्काळाच्या समस्या भेडसावत आहे.

save water

आज आपल्याकडे जे पाणी उपलब्ध आहे त्याचा योग्य वापर करण्याची वेळ आली आहे नाही तर आपणाला देखील पुढे अनेक संकटाना सामोरे जावे लागेल.

आज अनेक देशात पाण्याची पातळी कमी झाली आहे त्यामुळे त्याच्यावर देखील भीषण संकट ओढवत चालेले आहे. पाण्याचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे.

पाण्याची बचत कशी कराल

How to save water in daily life

panyacha sadupyog kara

 • गरजेच्या हिशोबात पाण्याचा वापर करा.
 • घरात जर नळजोडणी असेल तर पाण्याची कुठे गळती होत असेल ते शोधा व त्याची दुरुस्ती करून घ्या .
 • नळ व्यवस्थितपणे बंद करा.
 • पाणी पिताना आवश्यक तेवढेच पाणी ग्लास मध्ये घ्यावे , खूप जणांना सवय असते पाणी थोडे पितात व बाकीचे ओतून देतात ह्या सवयी बंद झाल्या पाहिजेत.
 • भांडी घासताना,ब्रश करताना, दाढी करताना,अंघोळ करताना  काही जणांना नळ चालू ठेवण्याची सवय असते . आवश्यक तेव्हाच पाण्याचा नळ चालू करा.
 • घराच्या फरश्या ,गच्च्या ,लाद्या जास्त पाण्याने धुवण्याचा भानगडीत न पडता ओला कपड्याचा पोछा लावावा.
 • जमिनीतील पाण्याचा उपसा जसे कि बोरिंग ,विहीर यांचा अनावश्यक उपसा करू नका .पाण्याचे साठे मर्यादित आहे याची काळजी अवश्य घ्या.
 • सार्वजिक काही ठिकाणी रेल्वे,बस डेपो तसेच इतर ठिकाणी वाॅश बेसिन,संडास असतात काही वेळीस अशा ठिकाण नळ चालू राहतात अशा वेळीस तो नळ बंद करावा अन्यथा तेथील कर्मचारी यांच्या लक्षात आणून द्यावे .
 • घराजवळ तुम्ही झाडांची लागवड केली असेल किंवा गार्डन बनवले असेल अश्या वेळेस ठिबक सिंचन किंवा झाडांच्या बुंध्याजवळ फक्त पाणी जाईल अशी व्यवस्था करा.
 • अनावश्यक वाहणारे पाण्याचा वापर झाडे लावण्यासाठी करा जेणेकरून आजूबाजूला हिरवळ तयार होईल.

How to conserve water resources

जलसंपत्तीचे संवर्धन कसे करावे?

 • पडणारे पावसाचे पाणी अडविले पाहिजे.
 • जमिनीत जास्तीत जास्त पाण्याचा जिराव होण्यासाठी खड्डे खोदणे.
 • मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड.
 • कारखान्यातील पाणी थेट नदीत,समुद्रात न सोडता त्यावर प्रक्रिया करून सोडले पाहीजे.
 • कचरा थेट पाण्यात टाकू नये.

पाण्याचा वापर panyacha vapar

 • औद्योगिक क्षेत्रात
 • शेती
 • उद्योगधंदे
 • घरकामात
 • वीजनिर्मिती

प्रत्येक मनुष्याने पाण्याची गरज लक्षात घेता योग्य ती पावले उचलली पाहिजेत. पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे. पाण्याची बचत केली पाहिजे.

थोड्या थोड्या पाण्याची बचत करून आपण कितीतरी लिटर पाण्याची बचत करू शकतो.

म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे !

Save Water Save Life.

मुक्या जनावरांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था.

घराशेजारी किंवा इतरत्र जंगलात पक्षी तसेच प्राणी पाणी पिताना आपणाला दिसतात परंतु उन्हाळ्याचा दिवसात पाण्याची पातळी कमी होते असा वेळेस प्राण्यांना सुद्धा पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत नाही.

 • पक्षांसाठी आपण घराच्या छतावर, अंगणामध्ये लहान झाडावर पाण्याचा डबा ठेवू शकतो.
 • पाळीव प्राणी जसे कि बैल ,कुत्रे ,मांजर यासाठी देखील आपण अंगणात पाण्यासाठी लहान कुंडी बनवू शकतो .
 • तसेच सार्वजनिक बोरिंग,विहीर या शेजारी काही अंतरावर एक लहान खड्डा करून किंवा लहान कुंडी करून त्यामध्ये पाणी भरून ठेवू शकतो .
 • मानवाला पाणी सहज उपलब्ध होते परंतु अशा वेळेस जनावरांचे हाल होताना दिसतात.

पाणी अडवा, पाणी जिरवा .

Health