आळस एक समस्या

आळस एक समस्या

(Click Here To Listening Podcast)

आळस हि एक समस्या आहे, परंतु त्यावर उपाय म्हणजे काम करण्याचे प्रयत्न करावेत जेणेकरून अंगातला आळस झटकून जाण्यास मदत होईल . रोज विचार करता कि उद्या सकाळ पासून लवकर उठून व्यायाम करेन ,धावायला सुरुवात करेन, परंतु दोन वर्ष होत आले पण अजून सुरुवात झाली नाही का यालाच आपण आळस म्हणतो ? 

रोज विचार करतो की एक अमुक-अमुक मला कामाची सुरुवात करण्याची इच्छा आहे, परंतु ते काम करण्याची इच्छा होत नाही, कंटाळा येतो   असे अनेक कारण  हजर असतात का याला आळस म्हणतात ?

एखादे काम आपल्याला पाच ते सहा दिवसात पूर्ण करायचे आहे आणि  आपण रिकामेच आहोत ते काम करण्यास आपल्याकडे पुरेसा वेळ देखील आहे परंतु आपल्याकडे अजून पाच सहा दिवस आहेत मग ते आपण उद्या करू किंवा परवा करू असे बघता बघता शेवटचा दिवस उजाडतो , व आपल्याला धावत पळत ते काम पूर्ण करण्याच्या मागे लागतो व ते काम पूर्ण झाले तर ठीक  नाही तर मग राहिलच ………का याला आळस म्हणतात ?

आता मला मूड नाही , खूप कंटाळा आला आहे , मला वैताग आला आहे , खूप थकल्यासारखे वाटते या मागे अनेक कारणे आहेत व हीच करणे आळस पणाला  जबाबदार आहेत.

पहिले कारण –  महत्वाचे कारण आहेत ती म्हणजे झोप हि झोप  पूर्ण घेतली नाही तर थकवा आल्यासारखे वाटते वा आळस येतो व थकल्यासारखे वाटते यासाठी  झोप हि पुरेसी घेणे महत्वाची आहे .

दुसरे कारण:- अनावश्यक आहार , शिळे अन्न ,जास्त फॅट वाले अन्न जास्त प्रमाणात सेवन करने

यासाठी उपाय म्हणजे अनावश्यक आहार घेणे टाळले पाहिजे .

तिसरे कारण :- एकाच ठिकाणी बसून राहणे यामुळे शारीरिक हालचाल कमी होतात , जे थकवा वाढवते यासाठी उपाय म्हणजे व्यायाम करणे रोज थोड्या फार प्रमाणात व्यायाम करणे गरजेचे आहे. यामुळे ताजेपणा व फ्रेशनेस वाढतो  तसेच मेडीटेशन  मुळे बौद्धिक, मानसिक थकवा दूर होतो.

चौथे कारण :- पाण्याचे सेवन योग्य प्रमाणात घ्यावे .

पाचवे कारण :- व्यसन करणे, दारू पिणे यामुळे आळशीपणा  येतो व आपल्याला चिंता वाटू लागते मनावर डिप्रेशन येते, आपण अधिक काळजी करू लागतो यामुळे आपण हातात सहसा  कोणते काम करण्यास धजावत नाही , व आपण  अती विचार करू लागतो ,अधिक उदास वाटू लागते.

यासाठी उपाय म्हणजे व्यसन करणे सोडून द्या.

हि माहिती आवडल्यास आम्हाला  कमेंट करून जरूर  कळवा व माहिती अधिक शेअर करा.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »