मोगरा लागवड

मोगरा लागवड

(आज आपण मोगरा या  पिकाच्या लागवडी बद्दल  माहिती घेणार आहोत .)

मोगरा (वनस्पती नाव : Jasminum sambac) हे एक फुल झाड आहे. हे फुल फिलिपिंस देशाचे राष्ट्रीय पुष्प आहे.

मोगरा हे अल्प मुदतीत भरगोस पिक देते हे फुल झाड आहे ,याला खूप काही मेहनत लागत नाही ,जनावरापासून जास्त  धोका नाही .याचे उत्पन्न हि भरपूर निघते . मोगरा हे पिक शेतकऱ्यांच आधारस्तंभ झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात भात शेती तसेच इतर लागवड केली जाते . परंतु मोगरा पिकाचे एकदा लागवड केली कि उत्पन्न हे बारा महिने चालू होते, मोगऱ्याच्या अनेक जाती आहेत , परंतु काही जातीचे मोगरा १२ महिने उत्पन्न देतात . मोगऱ्याचा कळीचा वापर गजरा बनविण्यासाठी , फुलांच्या माळा, फुलांचा बुके ,सोदर्य प्रसाधनामध्ये , अगरबत्ती , तसेच सुवासिक अत्तर इत्यादी वस्तू बनविण्यासाठी होतो. मोगरा फुलाचा रंग सफेद असतो .

मोगरा फुलाची लागवड  –

मोगरा रोप आणून 1.5 खड्डा खोदून लावणे , दोन रोपांच्या मध्ये साधारणतः 1.5 मीटर अंतर असावे जेणे करू त्यांची वाढ योग्य व्हावी , तसेच त्याचा घेर वाढवा . तसेच कळी काढण्यासाठी अडचण निर्माण होवून नये .

कीटकनाशक :

1 ते दीड वर्षापर्यंत रोपाची योग्य निगा राखावी लागते . वेळेवर फवारणी करावी लागते ,कीटकनाशक फवारणी करावी लागते .तसेच फुटवा वाढ, झाडे वाढणे यासाठी फवारणी करावी लागते.

पाण्याचा वापर :-

पाणी हे दिवसातून दोन वेळेस दिले पाहिजे , जर पाण्याचा तुटवडा असेल तर सकाळी एकदा दिले तरी देखील चालते .

मोगऱ्याची छाटणी करावी लागते , तसेच तन, गवत काढावे लागते ,वेळेवर फवारणी करावी लागते मोगरा पिक हे सावलीत नसावे , म्हणजेच मोठ्या झाडाखाली  याची लागवड करू नये.

भाव –

मोगऱ्याच्या कळीला बाजारात खूप मागणी आहे , भाव थंडीच्या दिवसात सरासरी ७०० ते ८०० मिळतो , साधारणतः प्रति 1 किलोसाठी  आणि तो वाढण्याची शक्यता असते. मोगऱ्याचा भावात सतत चढ – उतार असतो.

मोगऱ्याची जर शेती करायची असेल तर कमीत कमी साधारणतः ५०० रोपांची लागवड केली पाहिजे . किमान तुम्ही तुमच्या शेती च्या जागेच्या हिशोबानी करू शकता.

मोगरा  हे दगडाळ जमीन, माळरानावर तसेच उताराला देखील चांगल पिक देते .

मोगऱ्याची साधारणत उंची हे 5 फुटापर्यंत वाढते , तरी देखील याची एक ते दीड वर्षानंतर प्रत्येकी २ ते ३ महिन्यात याची छाटणी करावी लागते . छाटणी केल्यानंतर जे नवीन अंकुर फुटतात , त्याला कळी जास्त लागते, कळ्यांची संख्या जोमाने वाढते.

तर मित्रानो वाढलेली बेरोजगारी , नोकरी न मिळणे , शिक्षण कमी असल्याने इतर संधी कमी होतात त्याला आता पर्याय आहे कि सुधारित शेतीकडे वळा व स्वतः मालक व्हा . रोजगाराच्या संधी इतरत्र शोधत बसण्यापेक्षा स्वतः मेहनत करा व भरपूर कमवा. यशस्वी व्हा …….

Business Idea