एक नवीन सुरुवात..यशाची,प्रगतीची

एक नवीन सुरुवात..यशाची,प्रगतीची

(If listen Audio Podcast Please Click Here)

नवीन दिवसाची नवीन सुरुवात …………………………. start a new journey of life.

ज्या प्रमाणे वृक्ष आपले पिकलेली पाने गाळतात,आणी नवीन पालवी फुटू लागते .हिरवी, लाल, गुलाबी कोवळी पाने दिसू लागतात ,सुंदर फुले येतात अनेक झाडांना मोहोर येतो

त्या मोहरांवर बारीक कीटक,फुलपांखरे इतरत्र सर्वदूर दिसतात .

एक नवीन सुरुवात झाडे करतात त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातील जुन्या गोष्टी सोडून नवीन येणाऱ्या बाबीची स्वीकार केला पाहिजे.

चांगल्या गोष्टी स्मरणात ठेवून नवीन गोष्टीचा स्विकार केला पाहिजे .

झाडाला येणारी नवीन पालवी खूपच सुंदर ताजीतवानी वाटते . ते दृश खूपच मनमोहक वाटते,

त्याचप्रमाणे आपणही जुन्या गोष्टी सोडून नवीन गोष्टीची सुरवात केली पाहिजे .

life new journey

अपयश हे कायमचे राहत नाही..एक चांगली एकनिष्ठेची सुरवात तुमच संपूर्ण जीवन बदलवून  टाकते.

सकारात्मक  गोष्टींचा विचार करा,काही तरी नवीन ध्येय ठरवा  व एक-एक पाऊल टाकत चला.

प्रगती मंद गतीने होईल परंतु वर्षा अखेरीस तुम्ही खूप काही साध्य केले असेल.

नकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्यावर खूप होत असतो, अपयश येते, आपली चिंता वाढते,

घाबरल्यासारखे वाटते समाजामध्ये , सार्वजनिक ठिकाणी जाणे त्यामुळे जाणीवपूर्वक आपल्याकडून टाळले जाते, एक प्रकारचा  न्यूनगंड त्यामुळे निर्माण होतो.

या सर्वातून बाहेर पडायला हव,त्यासाठी चांगल्या माणसांची संगत धरा,पुस्तके वाचा,

सकारात्मक गोष्टींचे विचार करा, वरिष्ठ मंडळींचा सल्ला घ्या,व्यक्तिमत्व विकासाचा सर्वांगीण अभ्यास करा .

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ,अस समजून नवीन पहाटीचे स्वागत करून मनामध्ये प्रचंड

उर्जा निर्माण करून काहीतरी नवीन करण्याचा पर्यंत करा व यशस्वी व्हा .

 येणारा काळ हा तुमचाच असेल,येणारी प्रत्येक पहाट सुंदर असेल .ज्या प्रमाणे झाडाला नवीन

पालवी फुटते सर्वत्र पक्षांच्या चिवचिवाट ऐकु येतो सर्वदूर नयनरम्य वातावरण निर्माण होते जिकडे तिकडे सौंदर्याची  जशी उधळण चालू असते.

त्याचप्रमाणे एकदा कि आपले विचार सकारात्मक झाले कि आपल्या अवती भोवती आनंदच आनंद निर्माण होईल.  

लहान लहान गोष्टीमध्ये आनंद निर्माण करा . ज्या प्रमाणे एक झाड आपल्याला सावली देते .पशू-पक्षीनां राहण्यास घर देते .

फुले,फळे देते. आपल्याला प्राणवायू देते,  झाडाचे कार्य जसे निस्वार्थपणाने चालत असते.

 तसे आपणही वागून सर्वाना मदत केली तर आपल्या आजूबाजूचे वातावरण देखील सकारात्मक होईल .

 start a new journey……………

Ekउनाड दिवस