OTP

OTP

OTP  म्हणजे काय ? आणि याचा वापर कसा केला जातो ?

One Time Password  हा याचा फुल फॉर्म .

ओ.टी.पी चा वापर वेगवेगळ्या स्वरूप मध्ये होतो.

ओ.टी.पी चा वापर आपण ऑनलाईन Transaction  करण्यासाठी करीत असतो . आणि  हा OTP  फक्त काही मिनिटापुरताच मर्यादित असतो . ओ.टी.पी येण्यासाठी मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो.

ओ.टी.पी चा वापर तुम्हाला  कोणतीही वस्तू खरेदी करता असतांना तुम्ही जर तुमच्या डेबिट, क्रेडीट कार्ड चा वापर  करताना , नेट बँकिग करताना त्याच प्रमाणे ,कोणताही ऑनलाईन फॉर्म भरताना , एखादा Application मोबाईल मध्ये Install  करताना ,मोबाईल नंबर Verify करताना याचा वापर होतो .

OTP हा एक प्रकारचा पासवर्ड आहे . जर तुम्ही कोणत्याही वेबसाईट वर Account create करत असताना  आपण User name  आणि password create करतो. काही वेळेस ती वेबसाईट आपणाला पासवर्ड देते परंतु आपण जर पासवर्ड change केला तर तो जास्त सेफ असतो ,यासाठी आपल्या रजिस्टर  मोबाईल  नंबर वर  OTP येतो व त्या माध्यमातून आपण password बदलू शकतो .

आजचे युग हे डिजिटल झाले आहे . हा डिजिटल दुनियेत आपल्यांना Security ची  गरज असते.

यासाठी एक असा पासवर्ड ची गरज होती जो  प्रत्येक वेळेस आपण ऑनलाईन ट्रांसेक्शन च्या वेळेस वेगवेगळा पासवर्ड निर्माण करून देतो , जेणेकरून आपले  पैसे सुरक्षित राहतील व कोणतेही अडचण येणार नाही.म्हणून याचे समाधान म्हणून OTP Verification Code हे नवीन माध्यम प्राप्त झाल आहे . OTP हा एक असा कोड आहे ज्यामुळे आपले व्यवहार Security च्या दृष्टीने  सुरक्षित झाले आहे.

OTP चा कोड हा साधारणतः ४ अंकापासून  पासून ते ८ अंकापर्यंत असू शकतो.

तुमच्या ऑनलाइन देवान घेवान हि सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच सायबर क्राईम पासून बचाव करण्यासाठी OTP हा एक चांगला पर्याय आहे .

OTP हा अनोळख्या व्यक्तीला देवू नये . तसेच फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींन पासून सुरक्षित राहा .

Ekउनाड दिवस