pahila paus

pahila paus

पहिला पाऊस

पहिला पाऊस गारवा (pahila paus garva) व नवचैतन्य घेवून येतो.

एप्रिल – मे महिन्यात गरमीचे दिवस त्यात उष्णता खूप वाढायला लागते , अंगावरून घामाच्या धारा वाहू लागतात, पाऊस कधी बरसतो याची वाट बघत बसतो. जून महिन्यात पाऊस सुरु होण्याच्या आधी गरमीने आपले बेहाल होतात.

पावसाचे सर्व जन वाट बघत असतात, पहिला पाऊस केरळमध्ये दाखल होतो. वृत्तपत्र, टीव्ही,रेडीओ च्या माध्यमातून आपणास पावसाच्या बातम्या ऐकायला मिळतात.

ढग दाटून येतात आकाश काळभोर होते . विजांचा कडकडात होतो. त्यावर स्वार होवून पाण्याचे थेंब बरसू लागतात . पाण्याचा स्पर्श जमिनीला होताच मातीचा सुगंध सर्वदूर दरवळू लागतो.

उन पाऊस असताना सुंदर इंद्रधनुष्य ढगावारती स्वार होते . त्याचे ते नयनरम्य रूप डोळ्यात साठवून ठेवावेसे वाटते.

paus marathi lekh

तरुण,बच्चेकंपनी घरातून बाहेर येवून पहिल्या पावसात चिंब भिजतात पावसाचा मनमुराद आनंद घेतात.

अनेक कवी पहिल्या पावसाच्या कविता करतात. अनेक जुन्या आठवणी ताज्या- तवान्या होतात.लहानपणीचे सुंदर दिवस आठवतात.

पहिल्या पावसाचा आनंद त्यात चहा व गरम भजी खाण्याचा मोह सर्वाना लागतो.

लहान मुले कागदाच्या होड्या करून पाण्याच्या प्रवाहामध्ये  सोडतात.

पाऊस चालू होताच शेतकरी मंडळीच्या कामाची लगबग सुरु होते. बैलजोडी तयार करून नांगर जुंपले जाते. नांगरणी,पेरणीला सुरुवात होते.

भात, नाचणी (नागली),ज्वारी,भूईमुंग,तूर,इत्यादीची पेरणी तसेच घराच्या परीसरात वेगवेगळी भाजीपाला,फुलझाडे याची लागवड चालू होते.

पहिल्या पावसात गावाकडे खेकडे, मासे पकडणे असे उद्योग चालतात.

पाऊस पडल्यानंतर दोन दिवसात सर्वदूर नजर जाईल तेथे गवत जमिनीच्या बाहेर डोकावू लागते. झाडांवर, पानावर जमा झालेली धूळ पावसाच्या पाण्यात न्हाऊन निघते .

पावसात टक्कल पडलेल्या डोंगराला जणू नव्याने गवताच्या स्वरुपात केस उगवू लागतात.

सर्वदूर आल्हाददायक वातावर निर्माण होते.

पाण्याच्या प्रश्न सुटतात, कोरड्या पडलेल्या विहिरी, नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागतात .

डोंगराच्या उताराला पाण्याच्या प्रवाहाला धबधब्याचे स्वरूप प्राप्त होते.  

अनेक सहलीचे आयोजन केले जाते शहरातील लोक गावाकडे, धबधब्याच्या ठिकाणी,डोंगर माथ्यावर पर्यटनासाठी येतात.     

गरम चहा,बटाटेवडा,भजी,मक्याचे कणीस खाण्याची मजा काही वेगळीच असते.

Pahila Paus

पहिल्या पावसावर अनेक गाण्याची निर्मिती केलेली आहे .

पावसावर  निबंध, तसेच पाऊस कसा पडतो यावर  रिमझिम पाऊस rim zim paus padato, टीप टीप पाऊस tip tip barsa pani, tip tip paus padto, paus asa runzunata, rimjhim gire sawan,paus marathi song अनेक शब्दाची  कवितेची, गाण्याची रचना केली जाते .

हेही वाचा.

13 Easy Ways To Facilitate Daily Routine Become Success.

How To Make Time At Home During Lockdown

जल ही जीवन है! Jal Hi Jivan Hai

Ekउनाड दिवस