रानमेवा

रानमेवा

Healthy Ranmeva

रानमेवा म्हणजे जंगलात मिळणारे फळे जी  पूर्णपणे ताजी तवानी तसेच बिनाखताची असतात .

Click here to listening Marathi Podcast

ती  पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. एप्रिल-मे महिन्यात लागणाऱ्या सुट्टीत गावाकडे राहणाऱ्या मुले ह्या फळांचा मनमुराद आनंद घेतात.

तसेच काहीप्रमाणात बाजारात हि फळे आढळून येतात. आयुष्यात एकदा तरी या जंगली रानमेव्याची चव चाखली पाहिजे.

जी शरीराला खूप पौष्टिक व लाभदायी असतात .

तोरण

तोरण हे जंगलामध्ये आढळणारे फळ आहे . हे चवीला गोड ,तुरट असते . याचा रंग सफेद असतो. हे फळ देखील जंगलात आढळून येतात ह्या झाडाला खुप काटे असतात.

करवंद

हे जंगलात आढळणारे काटेरी झुडपे असतात.करवंद हे चवीला गोड,आंबट,तुरट,कडू या प्रकारची असतात.

करवंद पिकल्यावर त्याचा रंग काळा होतो . करवंद कच्चे असल्यावर याची चटणी तसेच लोणचे केले जाते. करवंद हि जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

आंबे

जंगलात आढळणारे आंबे जे गोड,आंबट असतात .जंगली आंब्यामध्ये त्याचा आकार जास्त मोठा नसतो ते आकाराने लहान असतात .

 जांभूळ

जांभूळ हे देखील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतात .या मध्ये देखील त्याची चव हि गोड ,तूरट असते .

नदीकाठी देखील जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणात  आढळून येते हि जांभळे चवीला खूप गोड असतात परंतु  या मध्ये बियाचा आकार मोठा असतो .

 खजूर  

खजूर जंगलामध्ये तसेच शेतावरती ,माळावरती ,शेताच्या बांधावरती मोठ्या प्रमाणात खजूर आढळून येते .

विशेषतः कोकणामध्ये खजूर मोठ्या प्रमाणत आढळून येते . बाजारात आपण जे खजूर विकत घेतो त्यापेक्षा या खजुराचा आकार लहान असतो. चवीला हे खजूर खूप गोड असतात.

बोर

बोर हे देखील रानात ,शेतावर ,माळरानावर आढळून येते चवीला आंबट गोड असतात . याचं झाडाला खूप काटे असतात.

विलयाती चिंच

 हे देखील रानात ,शेतावर ,माळरानावर आढळून येते चवीला तुरट गोड असतात . याचा रंग पिकल्यावर  लाल होतो. याच्या झाडाला खूप काटे असतात.

फणस

फणस हे काही प्रमाणात जंगलात आढळून येते . याची चव खूप गोड असते . या फळाचे आवरण काटेदार असते, परंतु या फळाची चव खूप गोड असते .

हे फळ आतून पिवळे असते . हे फळ लहान असताना , पिकण्याच्या पूर्वी याची  खूप सुंदर भाजी करता येते.

काजू

 काजू जंगलामध्ये शेतावर ,माळरानावर आढळून येते . काजू चवीला गोड तुरट असतो काजू लाल,पिवळ्या रंगामध्ये आढळतो . ज्या प्रमाणे काजू चविष्ट असतो त्याचप्रमाणे त्याची बिया सुद्धा खूप चविष्ट असतात .

खेड्यापाड्यात या काजूच्या बिया शेतकरी बाजारात नेवून विकतात व त्याबदल्यात जीवनावश्यक वस्तू घेवून येतात.

आळव

हे जंगली फळ चवीला आंबट गोड असते शक्यतो हे पावसाळा जवळ आल्यावर पिकते .हे झाडाला काटे असतात .

अथ्रून

हे एक जंगली फळ आहे याचा आकार खूप लहान असतो. हे फळे चवीला गोड असतात . याच्या झाडाला काटे असतात.

फळाचा रंग पिकल्यावर लाल होतो.

ताड

ताडाची झाडे जंगलात ,माळावर तसेच शेताच्या बांधावर आढळून येतात हे झाडे खूप उंच असतात. हि झाडे कोकणात आढळून येतात .

ह्या झाडांना जी फळे लागतात ती फोडून त्यामध्ये हे ताडगोळे काढले जातात याची चव गोड असते.

रानआवळे

रानआवळे चवीला तुरट असतात. परंतु काही काळ चघळत राहिल्यास तोंड गोड पडते. हे आरोह्यास खुप उपयुक्त फळ आहे .

याचा रंग हिरवा-पांढरा असतो . हे झाडे जंगलात आढळून येतात .

धामन

धामण चवीला गोड-तुरट लागते याचा रंग पिकल्यावर लाल होतो. जंगलामध्ये धामनाची झाडे मुबलक प्रमाणत आढळून येतात .

हुंबा

हुंबा ची झाडे जंगलात असतात ह्या झाडाची उंची खूप जास्त असते , पिकल्यावर फळ लाल होते . हुंबा मध्ये ज्या बिया असतात त्याला आंब्या प्रमाणे गर असतो. तो खाल्ला जातो.

त्याच प्रमाणे जंगलामध्ये विविध प्रकारची अनेक फळे मिळतात त्याच्या भौगोलिक स्थानानुसार त्यांना वेगवेगळी नावे आहेत.   

Click Here to Listen Podcast

माहिती आवडल्यास आपली प्रतिक्रिया कळवा तसेच शेअर करा. धन्यवाद

Health