yashaswi Jivanache Rahasya

yashaswi Jivanache Rahasya

Success

      कोणतीही मोठी गोष्ट साध्य करायची झाली तर ती काही एका झटक्यात साध्य होत नाही. त्याला बराच अवधी,कालावधी जातो .

मोठी स्वप्न पाहणारे लोक  मोठी होतात.

      खूप प्रयत्न करावे लागतात,संघर्ष करावा लागतो , प्रत्येक गोष्टीचा ताळमेळ बसवावा लागतो . जोखीम घ्यावी लागते . तेव्हा कुठे आपण यशाचा जवळ जातो .

अपयश हे अनेकदा येते, परंतु आपण आपला प्रयत्न सोडून न  देता त्याचा सतत पाठपुरावा करत राहिल्याने आपल्याला यश मिळतेच .

काही गोष्टी असतात कि ज्यावर आपल पूर्ण आयुष्य अवलंबून असते आणि ते आपण सोडू शकत नाही ,पण कितीही मेहनत केली तरीही हवे असलेले यश काही केल्या आपल्याला मिळत नाही ‘ अशा वेळी नकारात्मक विचार करू नये , त्या ऐवजी सकारात्मक विचार करा म्हणजे  यश तुमचेच असेल.

      ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हारू शकत नाही. या विचाराने पुढे जात राहिले कि आपल्याला हव असलेले यश आपण एक दिवस नक्की साध्य करू शकतो.

त्याच प्रमाणे लोक काय बोलतील या कडे लक्ष देवू नका कारण खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे ‘लोक काय म्हणतील’.

आपल्याला यश साध्य करण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसे.

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या मित्रांचे ,परिवारातील सदस्य ,तसेच आजूबाजूच्या लोकांचा आपल्यावर प्रभाव असतो .

आपल्याल जे साध्य करायचे आहे त्यासाठी त्यांची मदत घ्या आणि चुकीच्या व्यक्ती पासून लांब राहा.

यशाचा मूलमंत्र

चांगल्या लोकांची संगत धरा . चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो ,पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

तुमच्या समोर अनेक संकटे येतील त्या संकटाना सामोरे जा . संकटापासून दूर पळू नका.अडचणीत असताना अडचणीपासून  दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे.

आयुष्यात एका विशिष्ट स्तरावर पोहचल्यावर सुध्या तिथेच न थांबता पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहा.

आत्मविश्वास बाळगा – यश मिळविण्यासाठी स्वतःवर आत्मविश्वास असावा लागतो.

एकाग्रता- आपण करत असलेल्या कामात आपली एकग्रता खूप महत्वाची असते .इतरत्र लक्ष भरकटू देवू नका.

ध्येय – आपल ध्येय निश्चित करा  व त्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. आपण करत असणाऱ्या कामाचे आपण ठरवलेले ध्येयासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे ते पडताळा.  

तुमच्या जबाबदाऱ्या, ध्येय जितके  मोठे  आहेत ते साध्य करण्यासाठी मनाची तयारी करावी लागेल ,सर्व शक्ती एकटवावी लागेल. आणि त्याची पूर्ती करण्यासाठी आपणाला अनेक प्रयत्न करावे लागतील.

न हरता,न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशीब सुद्धा हरत.

 “Success is not final; failure is not fatal: It is the courage to continue that counts.”

— Winston S. Churchill

Ekउनाड दिवस