आले थंडीचे दिवस

आले थंडीचे दिवस

Winter Days Care Tips

.….अरे पावसाळा संपला पण अजून हिवाळ्याचा  महिना येऊन पण थंडी जाणवत नाही. परंतु तुम्ही याची वाट बघत बसू नका ! आपण काळजी घेतली गेली पाहिजे, ब्लांकेट घेतले का ?  स्वेटर घेतले का..? अशा अनेक गोष्टी घेतल्या का ? थंडीच्या दिवसात विशेष काळजी घेतली गेली पाहिजे.

हिवाळ्यात कोणते कपडे घालावेत ?

हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घेण्याची गरज असते . लोकरीचे कपडे वापरावेत. श्वेटर, कोट,मफलर,हात मोजे, पायातले मोजे . तसेच कान टोपी यांचा वापर केला पाहिजे.उबदार ब्लांकेट वापरले पाहिजे. Example

  हिवाळ्याच्या दिवसात त्वचा कोरडी पडते / शुष्क पडते. पायांना भेगा जातात , शरीरातील पाणी कमी झाल्याच्या  कारणाने त्वचा काळी पडते. म्हणून पाणी जास्त प्यावे , हिवाळ्यात पायांना भेगा जातात याची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. थंडी जास्त जाणवते म्हणून आपण उन्हात जातो परंतु उलट त्वचा अजून काळी पडते. कमीत कमी 10 ग्लास पानी रोज प्या. रोजच्या आहारात फ्रुट ज्युसचा समावेश करा. सगळ्यात आधी ऋतूनुसार आपले फेस वाँश व माँइश्चराइजर क्रिम जरूर  बदला.

हिवाळ्याच्या दिवसात ओठांची व पायांची विशेष काळजी घ्यावी लागते .

ओठांची काळजी कशी घ्याल ?

यासाठी तुम्ही लीप लोशन किंवा लीप बामचा वापर करू शकता.

रोजच्या आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर अधिक करावा.

लोणी लावून ओठांचा मसाज करावा

महिलांसाठी मॉइश्चराइजर टिकून राहतील अशा   लिपस्टिक उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा.  

त्वचेची काळजी कशी घ्याल ?

शुष्क त्वचेला लवकर सुरकुत्या पडतात म्हणून याची विशेष काळजी घ्या .

रोजच्या आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर अधिक करावा.

आठवड्यातून एक दिवस तेलाने मालिश करा.

कमीत कमी 10 ग्लास पानी रोज प्या.

साबणाने त्वचा अधिक कोरडी होते , तेव्हा साबण ऐवजी लिक्विड सोप वापरावे.

पायांची काळजी कशी घ्याल .

हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडी मुळे  शरीर लवकर शुष्क होते, यामुळे त्वचेवर याचा परिणाम होतो. थंड हवामानाचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो तो ओठांवर व  टाचांवर. पायांवरील भेगामुंळे चालणेदेखील कठीण होते.यामुळे पायांची विशेष काळजी घेणे आवश्यक  आहे . व पायांना क्रीम लावणे गरजेचे ठरते.

मॉइश्चराइजर क्रीम चा वापर करावा.

पायामध्ये मोजे घालावेत.

पायांना तेलाने मालिश करावी.

पायांना स्क्रब चा वापर करावा.

तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोउपचार घ्यावेत.

तर अशा प्रकारे तुम्ही हिवाळ्यात थंडी पासून बचाव करू शकता .

Just Try To find Some

""” target=”_blank” rel=”noreferrer noopener” aria-label=”Clothe (opens in a new tab)”>Clothe

Health