जगातील पाच  शिकारी वनस्पती

जगातील पाच शिकारी वनस्पती

तुम्हाला वाचून धक्का बसला असेल कि अश्या हि काही वनस्पती आहेत ज्या शिकारी आहेत.

    तुम्हाला माहिती आहेत का ?  या पृथ्वी वर काही अश्या वनस्पती आहेत, ज्या खूप विषारी आहेत व ज्या कीटक,बेडूक,उंदीर,खार,पाली ई. लहान जीव हे त्यांचे शिकार होतात.

 काही प्रजाती बद्दल आपण माहिती घेवूया .

 हे असे का होते असा प्रश्न तुम्हाला पडला  असणार ?

 तर ह्या वनस्पती जेथे आढळतात तेथे पोषक तत्वाची कमतरता आढळते. याची हीच कमतरता पूर्ण करण्यासाठी ह्या वनस्पती जीवांचे शिकार करतात. हे शिकार करताना त्यांचे प्रत्येकाचे वैशिष्टे वेगळे आहेत.

Venus Flytrap

   हे खूप सुंदर दिसणारी वनस्पती अतिशय विषारी व घातक आहे . जी फक्त अमेरिकेमध्ये आढळते . निसर्गाने या वनस्पतीची अशी काही रचनेची निर्मिती  केली  आहे, कि हे आता कोणाला तरी आपल्या पानांच्या जबड्यात पकडणार .जर या वनस्पतीवर   काही किटक येवून बसले कि याच्या दोन पानासारख्या दिसणाऱ्या पाकळ्या आपोआप मिटतात.  हे सात दिवसापर्यंत बंद  राहतात या  मध्ये  किटकाची  सुटका होऊ शकत नाही.   या वनस्पती मध्ये एक विशेष बाब आहे . ती म्हणजे हि पाने सजीव प्राणी तसेच निर्जीव प्राण्यांची ओळख करू शकते . जर यामध्ये निर्जीव वस्तू जाळ्यात सापडली तर ती त्याची ओळख करून काही तासात त्याला आपल्या जाळ्यातून मुक्त करतात.

DROSERA

हे देखील विषारी वनस्पती आहे याला sundews नावाने देखील ओळखता. याला पांढऱ्या लालसर रंगाचे फुल येतात व फुलांवर रेषा असतात .जे दिसायला खूप सुंदर व चमकदार दिसतात . परंतु या वनस्पतीवर  जर कीटक येउन बसला तर  ते खूप चलाख पद्धतीने त्याला पकडते . याच्यावर एक तरल पदार्थ असतो, ज्याला कीटक चिकटला तर स्वताची सुटका करू शकत नाही.या रोपट्यांचे अनेक जाती आहेत. ज्या Antarctica मध्ये आढळून येतात. हे ५० वर्षापर्यंत जगू शकते.  

NEPENTHES

हा एक कीटक भक्षी वनस्पती आहे.याच दुसरा नाव Tropical pitcher Plants , हि  वनस्पती चीन, मलेशिया,इंडोनेशिया  तसेच भारतात उष्ण कटिबंध प्रदेशात  आढळून येतात.तसेच दलदली भागात आढळून येतात.हे रोपट्याच्या तसेच वेलीच्या स्वरुपात आढळून येतात.ह्यांना Monkey cups देखील म्हणतात . ह्या वनस्पती मध्ये द्रव पदार्थांनी कीटक आकर्षित होतात व या वनस्पतीच्या अशी काही बनवटअसते कि त्यामध्ये हे कीटक त्यांच्या कचाट्यात सापडतात.

GENLISEA

 हा कीटक भक्षी वनस्पती आहे. याला Corkscrew plants या नावाने देखील ओळखतात. हि प्रजाती मध्य आफ्रिका व दक्षिण अमेरिका हा पिवळ्या फुल येणार गवतासारखी वनस्पती आहे. या मध्ये दोन वेगवेगळ्या पाने दिसून येतात .एक जमिनीच्या बाहेर असते व एक पानासारखा दिसणारे जमीनच्या आत असते या मध्ये एकदा कीटक गेला कि त्याला बाहेर निघता येत नाही.

DARLINGTONIA

 ह्या वनस्पती ला कोब्रा लीली तसेच कोब्रा प्लांट या नावाने देखील ओळखतात. हे नाव यासाठी पडले कारण याची रचना कोब्राच्या फना सारखी दिसते.हि वनस्पती सर्वात जास्त कॅलिफोर्निया मध्ये आढळून येते. याच्या काही प्रजाती भारतात नील गिरी मध्ये देखील आढळून येतात.

माहिती आवडल्यास नक्की शेअर करा . तसेच फेसबुक पेज ला लाईक करा .

Ekउनाड दिवस